यावर्षी कापसाला‘बाप्पा’ पावला, झाला नऊ हजारावर भाव! उत्पादकांना सुखकर्त्याचे शेतकऱ्यांना मिळाले ‘मोदक’
भडणेत ९ हजार ५१ रुपयांचा मिळाला भाव शेतकरी सुखावला

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
सिंदखेडा : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की यावर्षी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाला प्रति क्विंटल ९ हजार 99 रुपये इतका भाव मिळाला. खासगी व्यापाऱ्यांनी पाच शेतकऱ्यांकडून ४ क्विंटल ४६ किलो एवढ्या कापसाची खरेदी केली. खासगी व्यापारी मनोज निकम व प्रवीण गिरासे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी करून व्यापाराची सुरुवात करतात. शुक्रवारी त्यांनी ४ क्विंटल ४६ किलो एवढ्या कापसाची खरेदी केली. प्रशांत पाटील यांच्याकडून २६ किलो, विठ्ठल पाटील यांचा ४५ किलो, दिलीप दोधू पाटील यांचा २३, भगवान लहू पाटील यांच्याकडून २ क्विंटल ४६ किलो तर पोलादसिंग गिरासे यांच्याकडून १ क्विंटल सहा किलो कापसाची खरेदी केली
सातगाव @ ७६७१ कजगाव @७०११ कजगाव (भडगाव) येथे आज कापूस खरेदी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ७०११ रुपये असा भाव मिळाला.
कजगावचा धक्का जसा केळीसाठी प्रसिद्ध होता आता इथे कापसाची उलाढालही वाढणार आहे. व्यापारी पप्पू वाणी यांनी सहा क्विंटल कापूस खरेदी केला. धरणगाव @७०११ धरणगाव येथे ६२५३ रुपये दराने दोन हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. काटा व कापूस पूजन नयन गुजराती, जीवन बयास, सुरेश चौधरी, सागर करवा यांनी केले. नगराध्यक्ष नीलेश चौधरी, कापूस खरेदी-विक्रीचे एजंट प्रवीण पाटील, राम जडेजा, चेतन कोठारी, निखिल बयस उमेश चौधरी, नरेंद्र भदाने, गजानन साठे, किरण अग्निहोत्री व अनेक शेतकरी उपस्थित होते.
सातगाव डोंगरी (पाचोरा) येथे पांढया सोन्याला व्यापारी बाळू शंकर वाघ यांनी ७६७१ रुपये भाव दिला. परिसरात कापसाचा पेरा भरपूर असून, मात्र अति पावसाने कपाशीचे उत्पादन ५० टक्केच येण्याची शक्यता दर्शविण्यात येत आहे.