बिशप पी.सी. सिंह यांना जर्मनीहून परतताना सोमवारी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरून अटक करण्यात आली.

✍️त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं
मो 9096817953
नागपूर : D company कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी बिशप पी.सी. सिंह यांना जर्मनीहून परतताना सोमवारी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरून अटक करण्यात आली.मध्यप्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय.
बिशप पी.सी. सिंह यांचे पूर्ण नाव बिशप प्रेमचंद्र सिंह असून तो मूळचा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहे. ट्रस्ट अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळांचा पैसा धार्मिक कार्यात वापरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यापूर्वी ईओडब्ल्यू टीमने टाकलेल्या धाडीत बिशप पी.सी. सिंह यांच्या घरातून १.६५ कोटी रुपये रोख जप्त केले. यासोबतच परकीय चलनही प्राप्त झाले होते.
D company चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ट्रस्ट असोसिएशनने बिशप पी.सी. सिंह यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचवेळी बिशप पी.सी. सिंह वरील कारवाईनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर हे पैसे धर्मांतरासाठी वापरले तर नाही ना, हेही तपासले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेय. विशेष म्हणजे, उत्तर भारत जबलपूर डायोसीजच्या द बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्चच्या बिशप सिंह यांच्या घरातून दीड कोटींहून अधिक रोकडसह परकीय चलन, १७ मालमत्तांची कागदपत्रे आणि कुटुंबाच्या ४८ बँक खात्यांची कागदपत्रेही सापडली आहेत.
D company इओडब्ल्यूच्या तपशिलांवरून दिसून येते की, बिशपकडे ९ वाहने, १७ मालमत्ता आणि संस्था व नातेवाईकांची ४८ बँक खाती आहेत. छाप्यांमध्ये १ कोटी ६५ लाख १४ हजारांच्या रोख रकमेशिवाय १८ हजार ३५२ अमेरिकन डॉलर्स आणि ११८ पौंडांचा मुद्देमालही सापडला आहे. सूत्रांनी सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेने बिशप पी.सी. सिंह, त्यांचे कुटुंबीय आणि ट्रस्ट स्कूल यांची ४८ बँक खाती गोठवली आहेत. या सर्व बँक खात्यांतील प्रत्येक व्यवहाराची माहिती त्या बँकांकडून मागविण्यात आली आहे. ‘डी’ कंपनीशी त्याचे कथित संबंध समोर येत आहेत. दाऊदच्या जवळच्या मित्रासोबत त्याने मुंबईतील जिमखान्याचा सौदा केला होता. तपासादरम्यान ईओडब्ल्यूला त्याची काही कागदपत्रे मिळाली असून त्यासंदर्भातही तपासणी केली जात आहे.