कोलाड हद्दीत गुन्हे अन्वेषण शाखेने लाखोंचा अमली पदार्थ केला जप्त; दोन आरोपींना अटक, एक फरार

drugs-rackets-in-raigad

तेजपाल जैन 

कोलाड प्रतिनिधी

मो: 8928847695

रोहा-कोलाड रस्त्यावर असणाऱ्या मराठा पॅलेस हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने अमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे.

रोहा तालुक्यातील रोहा कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेलजवळ एक इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्या मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, पोलीस हवालदार विकास खैरनार, रुपेश निगडे, सुदीप पहेलकर, पोलीस शिपाई अक्षय जगताप, स्वामी गावंड, ओमकार सोंडकर या पथकाने सापळा रचून कारवाई केली असता रुपये 5,34,000/- किंमतीचा चरस हा अमली पदार्थ एकूण 1068 ग्रॅम वजनाचा प्रति ग्रॅम 500/- रु. प्रमाणे जप्त केले आहे.

यावेळी देवेंद्र जयदास पाटील (26), भारत आत्माराम पालेकर (30) दोन्ही राहणार जीवनाबंदर श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन, जि. रायगड यांना अटक केली असून राजन पांडूरंग चेवले (रा. जीवनाबंदर, श्रीवर्धन) हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.याप्रकरणी कोलाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 91/2023, एनडीपीएस कायदा 1985 कलम 8क, 20ब, ॥ क अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अमेझॉनवर खास ऑफर, मीडिया वार्ताच्या वाचकांसाठी
स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उपकरणे यांवर तब्बल ५०% सूट. लाभ घेण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here