ब्रम्हपुरीत दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार, आरोपीला अटक

vidarbha-crime-news-update

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

ब्रम्हपुरी, 11 सप्टेंबर: एका आरोपीने गावातीलच दोन शाळकरी अल्पवयीन मुलींना वह्या देतो असे सांगून त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी कैलास झोडे (40) याच्या याचे विरोधात पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे.

अमेझॉनवर खास ऑफर, मीडिया वार्ताच्या वाचकांसाठी
स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उपकरणे यांवर तब्बल ५०% सूट. लाभ घेण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा.

आरोपी कैलास झोडे याने दोन अल्पवयीन शाळकरी मुली खेळत असताना त्यांना शाळेत मोठे साहेब येणार असून ते तुम्हाला वह्या देणार आहेत असे सांगून शाळेत बोलावले. अल्पवयीन मुली शाळेत गेल्या मात्र आरोपी तिथे एकटाच दिसल्याने त्या परतल्या. मात्र आरोपीने दोन्ही मुलींना हात पकडून आपल्या घरी शैचालयामध्ये नेऊन अत्याचार केला, अशी तक्रार पालकांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याला दिली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने ब्रह्मपुरी पोलिसांनी लगेच आरोपी कैलास झोडे याच्या विरोधात कलम 354 (अ), 354 (ड) भादवी सह कलम 8, 12 पोक्सो 2012 सह कलम 3 (1) (डब्लू) (1) (2) 3 (2) व्ही) 3 (2) व्हीए), अनूसचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here