महाराष्ट्र शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

60

महाराष्ट्र शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

पोहेगाव येथील गोपाळे.(जाधव.)मॅडम यांचा सन्मान.

दैनिक मीडिया वार्ता अहिल्यानगर:कोपरगाव.
सुनील भालेराव.
9370127037

अहिल्यानगर. :- श्रीमती.मंगला गोपाळे मॅडम यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. जिल्हा परिषदेचा 2024 – 25 चा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातून कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
शिंदे वस्ती नवीन पोहेगाव. येथील आदर्श ,उपक्रमशील ,विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती. मंगला साहेबराव गोपाळे.(जाधव.) मॅडम यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .
श्री. गणेश जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.
हा पुरस्काराचा वितरण सोहळा दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी द्वारका लॉन्स अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
श्रीमती. मंगला गोपाळे मॅडम यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय ना .प्रा.राम शिंदे साहेब, माननीय ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब.
मंत्री जलसंपदा
( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर.

अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया साहेब,

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आनंद भंडारीसाहेब,

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब,

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय संध्याताई गायकवाड मॅडम,

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे योजना विभागाचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेब बुगे साहेब,

पारनेरचे तालुक्याचे आमदार मा. काशिनाथ दाते साहेब,
श्रीगोंदा तालुक्याचे आमदार मा. विक्रमसिंह पाचपुते साहेब यांच्या हस्ते श्रीमती.गोपाळे मंगला साहेबराव.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती नवीन पोहेगाव. तालुका कोपरगाव. जिल्हा अहिल्यानगर.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” हा फक्त एक सन्मान नसून शिक्षकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा, मेहनतीचा आणि निष्ठेचा गौरव आहे. समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या व विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षिका श्रीमती. गोपाळे मॅडम यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
श्रीमती. मंगला गोपाळे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून, विद्यार्थी हितासाठी राबवलेले उपक्रम दिशादर्शक ठरले व शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले .त्यांच्या या भरीव शैक्षणिक ,सामाजिक कार्यातून पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी कोपरगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय श्री. वाघेरे साहेब ,प्रभारी गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमती. शबाना शेख मॅडम, विस्तार अधिकारी इरोळे साहेब,विस्तार अधिकारी संजीवनी अंबिलवादे मॅडम, केंद्रप्रमुख श्री.भांड साहेब ,महानुभाव साहेब या सारखे अधिकारी यांचे वेळोवेळी प्रेरणा , मार्गदर्शन मिळाले.
तसेच,

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सहकारी शिक्षक व सर्व पालक
ग्रामपंचायत, सर्व पदाधिकारी व् ग्रामस्थ.
शाळेतील सर्व विद्यार्थी
कुटुंबिय,समाज.

या सर्वांची मोलाची साथ व मौलिक योगदान महत्वाचे ठरले. सर्व स्तरावरून त्यांचे खूप खूप अभिनंदन होत आहे व त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..
🔹🔹🔹