हुंडा नाही दिला म्हणुन, जाळले पत्नीचे गुप्तांग

बंगळुरु:- आज हुंडासाठी समाजात अनेक नवविवाहित मुलींना छळ सहन करावा लागतो. अनेक मुलींना तर या छळामुळे आपले जिवन संपवील्याचा घटना पण समोर आल्या आहेत. बंगळुरु शहरातील रामामुर्ति नगरमध्ये हुंडा साठी पत्नीचे गुप्तांग जाळल्याची धक्कादायक घटना उघडतीस आली. या घटना समाजमन सुन्न झाल आहे.
1 वर्षा पूर्वी सूरज सिंग या नराधमाचे 22 वर्षीय रागिनी (बदलेल नाव) या तरुणी बरोबर लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी सूरज सिंग ला हुंडा आणी घरासाठी लागणा-या सर्व संसार उपोयोगी वस्तु त्याला देण्यात आल्या. त्यानंतर ही नराधम सूरज ने पत्नीवर अत्याचार करुन वडीलाकडून पैसे आनायची सतत मागणी करत होता. या साठी तो तिच्यावर रोज अत्याचार करायचा मारायचा, त्यामुळे रागिनी (बदलेल नाव) या सर्वाला वैतागून सूरज सिंग ला बजावल की मला घटस्फोट दे आणी माझा आई वडिलांनी दिलेले पैसे आणी सामान परत दे असे सांगितले हे ऐकून सूरज सिंग एकदम रगिनी वर चिडला व त्याने आईच्या मदतीने आपली पत्नी रगिनीचे गुप्तांग जाळून टाकले.
गुप्तांग जाळल्या नंतर रागिनी जोरत असह्य वेदनेने आरडा ओरड सुरु केला. ते ऐकुन शेजारी धावत त्यांच्या घरी आले, मात्र सूरज सिंग व त्यांच्या आईला घेऊन फरार झाला होता. त्यानंतर शेजा-यांनी पिडीत रागिनीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी रागिनीच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here