जिजाऊ नवदुर्गा उत्सव मंडळ शेलुबाजार नवदुर्गा उत्सव साजरा न करता प्रशासनाला करणार सहकार्य
विनायक सुर्वे प्रतिनिधी वाशिम
वाशीम:- कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत शेलूबाजार येथील मा जिजाऊ नवदुर्गा उत्सव मंडळ यावर्षी येणाऱ्या नवदुर्गा उत्सव साजरा न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने करण्यात आला
संपूर्ण जगात cover 19 या रोगाने थैमान घातले आहे. तसेच वाशीम जिल्ह्यात या रोगाच्या दिवसान दिवस रुग्ण वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नवदुर्गा उत्सवाच्या आव्हान करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मा जिजाऊ नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्यावतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन मंगरूळपीर जिल्हा वाशिम यांना लेखी निवेदन देऊन मा जिजाऊ नवदुर्गा उत्सव मंडळ येणाऱ्या नवदुर्गा उत्सव साजरा न करता प्रशासनाला सहकार्य करणार असे जाहीर केले
लेखी निवेदनात मंडळाचे अध्यक्ष दत्ता भोयर. उपाध्यक्ष शुभम डोफेकर. सदस्य प्रतिक खीलोशिया यांच्या स्वाक्षर्या आहे.