हाथरस घटनेचा निषेध; भर पावसात पेटल्या भगिनीवर अत्याचारअसंतोषाच्या मशाली

56

हाथरस घटनेचा निषेध; भर पावसात पेटल्या भगिनीवर अत्याचारअसंतोषाच्या मशाली

पुणे:- प्रतिनिधी  – हाथरसच्या भगिनीवर अमानुष अत्याचार केले. यात ती कोणत्या जातीची होती, याला मी अजिबात महत्त्व देत नाही. पण, ती एक स्त्री होती आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले. हे सर्व थांबले पाहिजे, महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत, म्हणून मी या मोर्चात सहभागी झाले,” असे जयश्री नावाची युवती संतापाने आपल्या भावना व्यक्त करत होती.
लाल महाल परिसरात रविवारी संध्याकाळी युवक-युवती, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. कॉंग्रेस आणि लोकायत, आम्ही पुणेकरतर्फे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी लाल महाल ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा असा “कॅंडल मार्च’ काढण्यात आला. मार्च सुरू होतानाच पाऊसही पडत होता. महिलांनी हातामध्ये मशाली घेऊन हाथरसच्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींनी शिक्षा झालीच पाहिजे. उत्तर प्रदेश सरकारचा निषेध असो… अशा घोषणा हलगी व डफलीच्या तालावर देत हा कॅंडल मार्च मंडईच्या दिशेने निघाला. मंडई येथे पिडीतेला श्रद्धांजली अपर्ण करून मार्चचा समारोप झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने त्याचेही दर्शन या कॅंडल मार्चमध्ये झाले. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, तसेच आम आदमी पक्ष, इतर संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.