‘उमेद’ चे खासगीकरण करून महिलांना ‘नाउमेद’ करू नये.

55

‘उमेद’ चे खासगीकरण करून महिलांना ‘नाउमेद’ करू नये

‘लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड ‘ या चळवळीचे मुख्य संयोजक गंगाधर कांबळे परखड मत

विनायक सुर्वे प्रतिनिधी वाशिम

वाशिम :-  शासनाच्या वतीने सध्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानचे खासगीकरण करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.असे होणार असल्यामुळे अनेक महिलांच्या रोजगारावर गदा येणार आहे .महिला सक्षमीकरणाचा दावा या कृतीमुळे फोल ठरणार असल्याने लाखो महिलांची उमेदच यामुळे नाउमेद होणार आहे,असे परखड मत ‘लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड ‘ या चळवळीचे मुख्य संयोजक गंगाधर कांबळे यांनी मेडिया न्यूज वार्ता’ शी बोलतांना व्यक्त केले . दि .12 अॉक्टो .रोजी या उमेद अभियानामध्ये कार्य करणा-या महिलांचा मोर्चा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजीत करण्यात आला होता ,त्या मोर्च्या पाठींबा जाहिर करून तसे पञ मोर्च्याच्या आयोजक प्रियाताई पाठक यांच्याकडे सुपूर्द करून आल्यानंतर तेबोलत होते .
शासनाने या व्दारे महिलांची आर्थिक कुचंबना करू नये. ग्रामीण भागाच्या उन्नतीचा दावा शासन एकीकडे करत असेल आणि दुसरीकडे ते बंद करण्याचा घाट घालत असेल तर शासनाची ही भूमिका परस्पर विसंगत नाही का ? असा प्रतिप्रश्नही श्री . कांबळे यांनी उपस्थित करून या गोष्टीचे गांभिर्य ओळखून शासनाने प्रकार वेळीच रोखावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावेच लागेल असा इशारा सुध्दा कांबळे यांनी देऊन यासाठी महिलांनी सतर्क राहाव असे आवाहन देखील शेवटी केले आहे .