वर्धा जिल्हा निरीक्षक अशोक रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजन.

✒️आशिष अंबादे ✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841
वर्धा:- वंचित बहुजन आघाडी वर्धा तर्फे विदर्भ समिती संयोजक राहुल वानखेडे, प्रवीण हाडके यांच्या मार्गदर्शनात व वर्धा जिल्हा निरीक्षक अशोकजी रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण घेण्यात आले.
आज महाराष्ट्रात अड़. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन समाजाची वज्रमुठ बांधली जात आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा वाढता आलेख पाहुन अनेक प्रस्थापीत नेत्यांना घाम फुटला आहे. वंचितचे विदर्भ समिती संयोजक राहुल वानखेडे यांनी ओबीसी, एससी, एसटी आणि इतर माघास समाजांना कोणाच्या प्रयत्नाने व कसे आरक्षण प्राप्त झाले व काँग्रेस व भाजप कसे ते नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. प्रवीण हाडके यांनी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा अध्यक्ष अजय घंगारे यांनी ओबीसी समाजाला जागृत होऊन एकत्र येण्याचे आवाहन केले.
आंबेडकर चळवळीती जेष्ठ नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे वर्धा जिल्हा निरीक्षक अशोकजी रामटेके यानी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना करून धर्माची स्थापना कशी झाली हे सांगितले. महासचिव डोईफोडे यानी प्रशिक्षणाचे महत्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.
महिला उपाध्यक्ष मंगलाताई कांबळे यांनी आज सर्व महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी निर्माण केलेल्या आंदोलनात भाग घेऊन आपले हक्क, अधीकार अबाधीत राहण्यासाठी सर्वानी एक होऊन लढल पाहिजे असे आवाहन केले. आभार प्रदर्शन सुषमाताई वासेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला किशोर मस्के, दीपक फुसाते, दिघाडे साहेब, दादाराव वाघमारे, महिला प्रियदर्शना भेले, नम्रता भोंगडे, चचाणे मॅडम, ठाकरे मॅडम व अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.