मेडिकल कॉलेजमध्ये १० अतिरिक्त डायलिसिस मशीन द्या, रायुकाँ प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांची मागणी 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 11 ऑक्टोबर: चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सद्यस्थितीत ९ डायलिसीस मशीन असून त्यापैकी फक्त ८ डायलिसिस मशीन या कार्यरत आहे. यामुळे रुग्णांच्या तुलनेत मशीन अपुऱ्या पडत असल्याने तत्काळ अतिरिक्त डायलिसिस मशीन वाढविण्याची मागणी रायुकाँ प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनी अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका दिवसात जवळपास २२ ते २३ रुग्णांचे डायलिसिस या ८ मशीनवर होत असून एका रुग्णाला साधारणतः ३.३० तास लागतो आहे. सदर रुग्णांना एकदा डायलिसीस

सुरू झाली तर आठवड्यातून किमान २ वेळा व महिन्यातून किमान ८ वेळा उपचार करावाच लागतो. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सोबतच या उपचाराकरिता लगतच्या गडचिरोली व यवतमाळ तसेच काही प्रमाणात तेलंगाणा राज्यातील रुग्णसुध्दा येत असल्याने चंद्रपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थित असलेल्या ८ डायलिसिस मशीन या अपुऱ्या पडत आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात ही सुविधा मिळत नसल्याने खासगी दवाखान्यात होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात ही सुविधा मिळत नसल्याने खासगी दवाखान्यात एका दिवसाचे जवळपास ३ हजार ५०० रुपये देऊन उपचार करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात तत्काळ किमान १० अतिरिक्त डायलिसीस मशीन व यंत्रणा वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह खासदार आणि आमदारांना तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनाही देण्यात आले आहे.निवेदन देताना नितीन भटारकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य पंकज ढंगारे, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेजुळ, माजी सरपंच अमोल ठाकरे, नितीन घुबडे, रोशन फुलझेले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, सौरभ घोरपडे, ग्रा.प. सदस्य अनुकूल खन्नाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here