सीएसटीपीएस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सीएसटीपीएस : वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२ पुरस्कार

सीएसटीपीएस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सीएसटीपीएस : वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२ पुरस्कार

सीएसटीपीएस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सीएसटीपीएस : वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२ पुरस्कार

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : – चंद्रपूर पाण्याचा काटकसरीने विशेषतः कमीतकमी वापर केल्याबद्दल चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला ( सीएसटीपीएस )नुकतेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मिशन एनर्जी फाऊंडेशन द्वारे ‘वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन ८ व ९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. यामध्ये वीज केंद्राला हा पुरस्कार देण्यात आला. २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या सीएसटीपीएस. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी वापराचे अनेक अडथळे, आव्हानांवर मात करीत सूक्ष्म नियोजन केले.
महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज
सपाटे, उप मुख्य अभियंता मदन अहिरकर, विजया बोरकर, राजेश राजगडकर, अनिल पुनसे, अधीक्षक अभियंता पुरुषोत्तम उपासे, सुहास जाधव, फनिंद्र नाखले, प्रभारी कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ रमेश भेंडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here