युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुसद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी राजेश ढोले साहेब यांची निवड..!

48
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुसद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी राजेश ढोले साहेब यांची निवड..!

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या
पुसद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी राजेश ढोले साहेब
यांची निवड..!

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुसद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी राजेश ढोले साहेब यांची निवड..!

✒️ बबलू भालेराव ✒️ ऊमरखेड तालुका प्रतिनिधी
मो 9637107518

पुसद (दि.12 ऑक्टोंबर) पत्रकार क्षेत्रातील संघटनात्मक व उल्लेखनीय कार्याबद्दल आयु. राजेश ढोलेयांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुसद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ही निवड युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांनी दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी नियुक्तपत्र देऊन संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.

अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष असून ते आजही विविध सामाजिक संघटनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दैनिक वृत्तरत्न सम्राट, दैनिक जनतेचा महानायक मुंबई, दैनिक जनसामर्थ्य, बहुजन सैनिक महाराष्ट्र, म-मराठी डिजिटल न्यूज, द मिरर, सुहानी समाचार, इत्यादी दैनिक वर्तमानपत्र, डिजिटल मीडिया तथा यूट्यूब चैनल च्या माध्यमातून प्रसार माध्यमांमध्ये काम केले आहे.

सध्या ते रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनल चे विदर्भ उपसंपादक, तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी या पदावर कार्यरत आहेत.
त्यांचे या निवडीबद्दल सर्वच थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड, तथा संघटनेचे समस्त पदाधिकारी, दैनिक विदर्भ केसरीचे पुसद तालुका प्रतिनिधी विजय निखाते, दैनिक अधिकार नामाचे कैलास श्रावणे, थ्रीडी न्यूजचे यवतमाळ प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर,दैनिक सचित्र न्यूज चे उमरखेड तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ दिवेकर, बबलु भालेराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी दैनिक मीडिया वार्ता न्यूज), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड), शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ), राजकुमार भगत, शरद खंदारे बेलोरा, बाळासाहेब ढोले पुसद, ज्योतिबा थोरात इसापुर, इत्यादींनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.