जिल्हयातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरूच… • भरत गुप्ता, प्रतिमा ठाकुर यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांचाही पक्षाला रामराम

51
जिल्हयातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरूच... • भरत गुप्ता, प्रतिमा ठाकुर यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांचाही पक्षाला रामराम

जिल्हयातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरूच…

• भरत गुप्ता, प्रतिमा ठाकुर यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांचाही पक्षाला रामराम

जिल्हयातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरूच... • भरत गुप्ता, प्रतिमा ठाकुर यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांचाही पक्षाला रामराम

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 12 ऑक्टोंबर
जिल्ह्यात मनसेच्या दोन पदाधिकार्यांच्या राजीनाम्यापाठोपाठ आता महिला सेना तसेच वाहतूक सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही वरिष्ठांच्या सोबतीला सोबत करत आपले सामूहिक राजीनामे देणे सुरू केले आहे. यावेळी पत्रपरिषदेत बोलताना भरत गुप्ता म्हणाले, गेल्या वर्षी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रपुरात नेतृत्वबदल करण्यात आले होते, युवांना नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. महिला सेनेच्या शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकुर यांच्याकडेही जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली, परंतु दोन्ही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांनी कधीही महिला जिल्हाध्यक्षांना मान दिला नाही, समन्वय न राखता सोबत जिल्हा दौरा केला नाही. यातच या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी काम करणारे वाहतूक सेनेचे चे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले, असे भरत गुप्ता यावेळी म्हणाले. पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत कलहामुळेच आपण मुंबई येथे शिवसेना नेत्या नीलमताई गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असेही ते म्हणाले. नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवत महिला सेना तसेच वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्धार केला व एक शिवसैनिक बनून काम करण्याचा संकल्प घेतला.