भाजप महामंत्री आमदार विक्रांत पाटील ठाणे-कोकण विभागीय नियोजन बैठकीला हजर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल/मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश कार्यालय येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा ठाणे-कोकण विभागीय नियोजन बैठकीत आढावा घेण्यात आला.
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी मतदारसंघनिहाय नियोजन, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ,चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, गणेश नाईक , खासदार नारायण राणे , महामंत्री माधवी नाईक , महामंत्री विक्रांत पाटील यांच्यासह ठाणे – कोकण विभागातील भाजपा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलीकडेच नवी मुंबईतील भाजप नाईक गट व शिंदे सेना गटातील वादाची ठिणगी पडलेली असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना भाजप चाणक्य रणनीती घेऊन कसं सामोरा जातंय हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे, तसेच पनवेल महानगर क्षेत्रात सद्य स्थितीत भाजप चे दोन आमदार असून , नवी मुंबई विमानतळ नामांतराच्या मुद्द्यावर स्थानिकांमधे असलेले नाराजी ही भाजप ल अब की बार कितने पार? घेऊन जातयं हे येणारा काळच ठरवेल.









