ज्येष्ठ नागरिकांची पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कळंब शहरातून मदत रॅली 

80

ज्येष्ठ नागरिकांची पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कळंब शहरातून मदत रॅली

अच्युत पौळ

प्रतिनिधी कळंब

9860452735

कळंब जि.धाराशिव – सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे व नदी, नाले याला आलेल्या महापुरामुळे शेती, शेतीतील पिके, जनावरे, गोठे ,शेती उपयोगी साहित्य, नदीकाठची घरे याचे प्रचंड नुकसान झाले आहे, या आपत्तीग्रस्त लोकांवर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे हा विचार लोकांपर्यंत पोंहचावा यासाठी कळंब येथील ज्येष्ठ नागरिकांनी दिं. १० ऑक्टोबर रोजी मदतकरा – मदतकरा पूरग्रस्तांना – मदत करा आशा घोषणा देत कळंब शहरातून मदत फेरी काढली.

मदत फेरीत ज्येष्ठ नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी मदत असे लिहिलेले बॉक्स हातात घेऊन फेरी मार्गातील दुकान, टपरी ,ठेला हातगाडी , छोटे मोठे व्यावसायिक यांच्याकडे जाऊन ही मदत गोळा केली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही मदत फेरी मार्केट यार्ड, रंगीला चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मेन रोड, सराफा लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचल्यानंतर या मदत फेरीचा समारोप करण्यात आला.

या फेरीत ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, ऍड, त्र्यंबकराव मनगिरे ,ऍड,दिलीपसिंह देशमुख, अच्युतराव माने, राजाभाऊ आंधळे, विलास करंजकर,सुफी समशोद्दीन सय्यद, माधवसिंग राजपूत, कल्याण खापे, मधुकर शीलवंत ,शिवाजी गडकर, गोकुळदास आडसुळ,बी.के. झाल्टे,उत्रेश्वर शिंगणापुरे, यशवंत हौसलमल, चंद्रकांत तांबारे, बशीर पठाण, गुलाब बागवान, पांडुरंग माळवदे, सरस्वती आडसुळ, साखरबाई काळे,तसेच शहरातील सामाजिक क्षेत्रातील युवा कार्यकर्ते राहुल हौसलमल, बाळासाहेब कथले,यांनी सहभाग घेतला या फेरीच्या माध्यमातून जमा झालेली मदत रुपये ,२३,६०० चा ड्राफ्ट मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करण्यात येत आहे.