Home latest News हिंगणघाट दिव्यांगाच्या निधीचे दिवाळी पूर्वी वाटप करा! अन्यथा नप कार्यालयात दिव्यांग दिवाळी...
हिंगणघाट दिव्यांगाच्या निधीचे दिवाळी पूर्वी वाटप करा! अन्यथा नप कार्यालयात दिव्यांग दिवाळी साजरी करणार – प्रहारचे गजू कुबडे यांचा इशारा

हिंगणघाट:- नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांगाना शासन निर्णया प्रमाणे 5 % निधीचे वाटप त्वरीत करण्यात यावे अशी मागणी प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी नप मुख्याधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे.
नगर परिषदेने स्वतःच्या उत्पन्ना तून 5 % निधी हा दिव्यांगासाठी राखीव ठेऊन त्यांना त्यांचे वाटप करावे असा शासन निर्णय आहे.परंतु नगर परिषदेकडून या निधीचे वाटप अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही.कोरोनाच्या महामारीने या दिव्यांगावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.शासनाचे आदेश असूनही या निधीचे वाटप करण्यास नप प्रशासन टाळाटाळ करीत आहे.येत्या दिवाळीच्या पूर्वी जर या निधीचे वाटप झाले तर दिव्यांगाची दिवाळी आनंदात जाईल. त्यामुळे नगर परिषदेने या निधीचे वाटप दिवाळीपूर्वी करावे अन्यथा प्रहार संघटना आपल्या परीने आंदोलनाचा मार्ग अवलंबिलेलं व त्यासाठी नप प्रशासन जबाबदार राहील असा इशारा रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी दिलेला आहे.
नप मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर अपंग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख राजेश पंपनवार, तेजस डहाके,सुखदेव थुटटकर,कुंदन नक्के,देवा मकरे, सौरभ देशपांडे,अमोल किलनाके,रितेश गुडधे यांच्या सह्या आहेत.