कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचे षडयंत्र नागरिकांनी हरकती घ्याव्यात: पत्रकार बाबा रामटेके

60

कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचे षडयंत्र नागरिकांनी हरकती घ्याव्यात: पत्रकार बाबा रामटेके

               ==== मुख्य मुद्दे ====
● हरकती घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हरकतीचा पाऊस पाडातरच आंबेडकर उद्यान वाचेल..
●डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान वाचवायचे असेल तर आज 12 तारीख शेवट आहे हरकती घेण्याचा तारीख.
● पत्रकार बाबा रामटेके यांचे जाहिर आव्हान.

कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचे षडयंत्र नागरिकांनी हरकती घ्याव्यात: पत्रकार बाबा रामटेके
कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचे षडयंत्र

कल्याण प्रतिनिधी ✒
कल्याण:- कल्याण पश्चिम मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान महानगर पालीका नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याची संताप बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटीच्या नावाखाली करण्याचा घाट महापालिकेचे अधिकारी यांनी घातला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे ज्या दिवसा पासून 1965 पासून झाले तेव्हा पासून हे उद्यान हे अनेक लोकांच्या पोटातील दुखणे झालेले होते. हा बऱ्याच वर्षाचा पोटातील अपेंडिक्स ट्यूमर आज फुटला आहे. आणि त्यांना आनंद झालेला आहे.

कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचे षडयंत्र नागरिकांनी हरकती घ्याव्यात: पत्रकार बाबा रामटेके

आंबेडकर उद्यान नष्ट करण्या साठी आज पर्यंत तीन वेळा रस्ता रुंदीकरनाच्या नावाखाली तीन वेळा कटिंग करण्यात आली. दोनदा मुरबाड रोड साठी आणि एकदा रुक्मिणीबाई हॉस्पिटल साठी. आणि आता स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिस पुलाच्या नावा खाली अर्धे उद्यान घेण्याचा प्रयत्न दुष्ट महानगर पालिका अधिकारी करीत आहेत. अधिकारी वर्गाचा जातीवाद आजही संपलेला नाही. म्हणून यांनी रस्ता रुंदीकरण नोटीस उद्यानात लावली नाही. नागरिकांना कळू दिली नाही.

आता आंबेडकर उद्यान याला उद्यान म्हणावे का? अशी परस्थिती होणार आहे. आज हे उद्यान शिवाजी चौकातून दिसते ते सॅटिस ब्रिज मूळे दिसणार नाही. उद्यानच नष्ट होणार आहे.

कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचे षडयंत्र नागरिकांनी हरकती घ्याव्यात: पत्रकार बाबा रामटेके
हरकत घेताना नागरिक

तरी बंधुनो महापालिकेच्या आयुक्तानी हरकती मागवल्या आहेत. तरी हरकती घ्या. एकत्र येऊन मोर्चे आंदोलन यांचे आयोजन करा. सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष यांनी हरकती घ्या. आणि निवेदन देऊन त्याचा पाऊस पाडा. परंतु एकत्र येऊन हा लढा लढावा लागेल हे लक्षात घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कोणत्याही प्रकारे नष्ट होता कामा नये. याची खबरदारी आपली सर्वांची आहे. लढायला सज्ज व्हा. एकजूटीनेच यश मिळेल. असे आव्हान पत्रकार बाबा रामटेके यानी मिडिया वार्ता न्युजला दिलेल्या निवेदनातुन केला आहे.