ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेल वरील करात कपात करून जनसामान्यांना दिलासा द्यावा. ब्रम्हपुरी भाजपा, भा.ज.यु.मो चे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

59

ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेल वरील करात कपात करून जनसामान्यांना दिलासा द्यावा.

ब्रम्हपुरी भाजपा, भा.ज.यु.मो चे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेल वरील करात कपात करून जनसामान्यांना दिलासा द्यावा. ब्रम्हपुरी भाजपा, भा.ज.यु.मो चे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेल वरील करात कपात करून जनसामान्यांना दिलासा द्यावा.
ब्रम्हपुरी भाजपा, भा.ज.यु.मो चे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- दिवाळीच्या पर्वावर जनसामान्यांना दिलासा मिळावा याकरिता देशातील मोदी सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कमी केले. प्रति लिटर पेट्रोल च्या मागे ५ रुपये व प्रति लिटर डिझेल च्या मागे १० रुपये कपात करून जनसामान्य जनतेला दिलासा दिला. यामुळे महाराष्ट्रातही पेट्रोल ६ रुपये व डिझेल १२ रुपयांनी स्वस्त झाले.

केंद्र सरकारच्या पाठोपाठ इतर भाजपा शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेल वरील राज्याचा करात कपात केली. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकाने अजून राज्याच्या कर दरात कपात केलेली नाही. राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो तर पेट्रोल २५ टक्के व्हॅट आकारला जातो. सोबतच पेट्रोल प्रतिलिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी प्रतिलिटर ३ रुपये सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला डिझेल व पेट्रोल व करापोटी ३० ते ४० रुपये प्रति लिटर मिळतात.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ही पेट्रोल डिझेल वरील कर दरात कपात करावी, यासाठी ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी च्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यात इंधनावर राज्य सरकारने कर कमी करून जनतेला दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री कृष्णलाल सहारे, भाजपा शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, पं. स सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, पं. स उपसभापती सुनीता ठवकर, साकेत भानारकर, प्रा.अशोक सालोटकर, पं. स सदस्य विलास उरकुडे, पं.स सदस्या ममता कुंभारे, भा.ज.यु.मो जिल्हा उपाध्यक्ष तथा पं. स सदस्य प्रकाश नन्नावरे भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, युवा मोर्चा शहर महामंत्री रितेश दशमवार, युवा मोर्चाचे गणेश पिलारे, युवा मोर्चाचे अविनाश मस्के, माजी सरपंच मनोज ढवळे, गजानन ढोरे, संतोश वागधरे यांच्या सह भाजपा, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.