साईबाबाच्या जयघोषात दुमदमली हिंगणघाट नगरी.

✒ मुकेश चौधरी ✒
उप संपादक मीडिया वार्ता न्युज
हिंगणघाट:- स्थानीय डॉ. मुजुमदार वार्ड आणि नेहरू वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई उत्सव सोहळा दि.07 ते 10 नोव्हेंबर 2021 ला काळी सडक दर्गाह परिसर येथे आयोजित केला होता.
दि.07 नोव्हेंबर ला सायं. 5.00 वाजता साई पादुका नगर भ्रमण शोभायात्रा काढली गेली. दि. 08 नोव्हेंबर ला दुपारी रांगोळी स्पर्धा व सायंकाळी 6.00 वाजता श्री.नरेंद्रजी नाशिरकार यांचा साई रुद्र कार्यक्रम. शिर्डी येथून आलेले श्री. अशोकजी नागरे यांचे स्वागत करण्यात आल. तसेच दि.10 नोव्हेंबर ला महाप्रसाद, साई पादुकाचे दर्शन व द्वारकामाईचे दर्शन तसेच सायंकाळी 6.00 वाजता महाआरती आणि साई गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित होता.
या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे यावर्षी साक्षात साईबाबाच्या चरण पादुका, साईबाबांनी म्हाळसापती यांना ब्रह्मा, विष्णू, महेश सदृष्य स्वरूपात दिलेली तीन नाणी आणि बाबांनी स्वयं धारण केलेली कफनी हि शिर्डीवरून हिंगणघाट वासीयांच्या दर्शनासाठी आली. सर्व हिंगणघाट वासीयांनी दर्शनच्या लाभ घेतला. सायंकाळी शहराच्या प्रमुख मार्गने दिंडी काढण्यात आली. सर्व वस्तु भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या तसेच भव्यदिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी सर्व भक्तांच्या सहभागाने महाआरतीचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर ‘साईकला मंच’ प्रस्तुत अतुल गौळकार यांचा साई गीताचे आयोजन करण्यात आले. या पादुकांचे योग प्रामुख्याने येथील प्रतिष्ठित साईभक्त डॉ. वैभव देवगिरकर यांच्यामुळे झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, ठाणेदार संपत चव्हाण, डॉ. निर्मेश कोठारी, शहाणे साहेब, लाला महाराज, सौ. निता गजभिये, श्री रामकृष्ण मिशनचे संत यादवराव वियानवार तर यावेळी संकेत वाघे, तेजस धात्रक व योगेश हेडाऊ यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे मंच संचालन दिपक माडे व स्वप्नील वाघे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न मार्गदर्शन गोपालराव गौळकार, प्रणयकुमार जोशी, गोवर्धन राठी, बालुभाऊ गौळकर, संदीप पोटरकर, राजु रूपारेल, सुधीर कुरझुडकर, जयंत शेंडे, शकील अहमद, संदीप वाघे, अंकुश राऊत, निखील वकील, समीर वकील, गणेश हबर्डे, भीमराव कुंभारे, प्रवीण कारळकर, गुड्डू जोशी, बाबू सतेजा, गोपाल पुरोहित, सचिन वाघे, दीपक पोटरकर, राकेश झाडे , दीपक फरदे आशीष कारळकर, सागर झाडे, चेतन प्रधान, श्री ढगे, मुकेश मारवडकर, सागर प्रधान, विनोद गौळकार, विठ्ठल गौरखेडे, राजेश कोचर, छगन हिंगमीरे, प्रवण गेडाम, अविनाश बक्शी, कुणाल फरदे, अक्षय गौळकार, साई गोळकार, दत्तु लढी, प्रतिक गौळकार, विनोद झाडे, प्रकाश राऊत, धर्मा धात्रक, अरूण प्रधान, सुमित प्रधान, रतन ठाकूर तसेच साई महिला परिवारातील सर्व सदस्या यांनी सहकार्य केले. राजेश अमरचंद कोचर यांनी ही माहिती दिली.