मनपाद्वारे १५ अतिधोकादायक ईमारतींना अंतिम नोटीस जारी, 7 इमारती पाडण्यात आल्या, नागरीकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो:8830857351

चंद्रपूर,11 नोव्हेंबर: चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील 15 इमारती या अतिधोकादायक वर्गातील असून, त्यातील 7 इमारती पाडण्यात आल्या आहेत. तर उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना महापालिकेतर्फे घर सोडून त्वरित स्थलांतरित करण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. नोटीस अंतर्गत इमारत शिकस्त व जीर्ण झाल्याचे नमुद असून, इमारतीत वास्तव्य करणार्‍या नागरिकांनी अन्य सुरक्षितस्थळी त्वरित स्थलांतरित होण्याचे बजाविण्यात आले आहे.

झोन क्रमांक 1 अंतर्गत 6, झोन क्रमांक 2 अंतर्गत 8 तर झोन क्रमांक 3 अंतर्गत 1 इमारत अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींना 30 वर्षापेक्षा ज्यास्त कालावधी झालेला आहे. यातील 7 इमारती पाडण्यात आल्या आहेत. तर उर्वरितांना घरे रिकामी करण्याच्या 2 नोटीस यापूर्वी व आता अंतिम नोटीस देण्यात आली आहे. मनपा हद्दीतील बापटनगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतमनगर, रामाला तलावाजवळील 1 व मिलन चौक येथील 2 इमारती अश्या एकूण 7 अतिधोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत.

पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे, अशा अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे. यापुर्वी घुटकाळा वार्ड येथील एकोरी प्रभाग क्रमांक 10 येथील एक अतिधोकादायक इमारत कोसळून एक व्यक्ती जखमी तसेच वित्तहानीही झाली होती. अश्याप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊन जीवितहानी व वित्तहानी होऊ नये याकरीता धोकादायक इमारतींचा वापर थांबवून तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here