अंधश्रद्धेच्या आहारी जावू नये

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

नागपूर: अंधश्रद्धेच्या एवढं आहारी जावू नये की आपण नेस्तनाबूत होवू. मुलं नवसानं वा मंदिरात गेल्यानं वा बाबांकडे गेल्यानं होत नाहीत. ती होतात चांगला आहार घेतल्यानं. असा आहार कोणता घ्यायचा हे डॉक्टर सांगू शकतो. तांत्रीक वा मांत्रीक नाही. तांत्रीक वा मांत्रीक आपल्या भोळ्याभाबडयापणाचा फायदा घेवून आपल्याला लूटलूट लूटत असतो. जे आपल्याला पुढील काळात जड जाणार असते. तसेच असे नवश बोलू नये की जे आपल्याला पुर्ण करता येणार नाही. कारण अलीकडे कलियुग आहे. या कलियुगात आपण आपले नवश बोलून जातो. परंतू ते पुर्ण करता न आल्यास आपलेच शल्य आपल्याला टोचते व त्याचा परिणाम आपल्याला गंभीर समस्या निर्माण होण्यात वा गंभीर आजार होण्यात होतो.*

  अलीकडे मुल न झाल्यास लोकं देवाला वा देवीला नवश करतात. त्यातच कोणी कोणी असे नवश करीत असतांना विचित्र असे नवशही करीत असतात. त्या नवसात मी पहिला मुलगा तुला अर्थात देवाला चढवील असाही नवश असतो. याचा अर्थ असा की मी माझा स्वतःचा मुलगा स्व हातानं कापेल. आहे ना विचित्र नवश. परंतू याला इतिहास आहे. पुराण कथेत आहे की चांगोला नावाच्या राणीला बरेच दिवस पुत्र प्राप्त न झाल्यानं तिनं नवश केला होता की मला पुत्र प्राप्त झाल्यास मी तुला स्वतःच्या हातानं माझ्या पुत्राचं मांस त्याचं जेवन बनवून खावू घालेल. मग तिनं तसा नवश बोलताच व देवाला साकडं घालताच तिला मुल प्राप्त झालं. त्यानंतर प्रत्यक्ष भगवान आले साधू रुपात. त्यांनी सांगीतलं की मी तुझा नवश पुर्ण करुन घेण्यासाठी आलो आहे. मला भिक्षा दे आणि भिक्षेत मला तुझ्या पुत्राच्या मांसाचं जेवन दे. शेवटी आपला नवश पुर्ण करण्यासाठी चांगोलाला तिच्या मुलाला स्व हातानं कापावं लागलं. परंतू ते सतीयूग होतं. वचनाला महत्व होतं त्या काळात. आज तसं नाही. कारण कलियूग आहे आज. सतीयूग नाही.

याबाबत आणखी एक उदाहरण देतो. मैनाताईला मूल न झाल्यानं तिनं नागद्वारला नवश केला की मला मुलगा झाल्यास मी तुला कुंकवाचा टिळा लावेल. नवश बोलल्यानंतर कावळा फांदीवर बसून फांदी मोडल्यागत तिला मुलगा झाल्या. तो मुलगा सहा वर्षाचा होताच तिला नवसाचं आठवलं व ती नागद्वारला गेली. तिथं तो नवश पुर्ण करुन घेण्यासाठी एक साप आधी लहान रुपात आला व मनुष्यवाणीनं म्हणाला, ‘मला कुंकवाचा टिळा लाव. परंतू त्याला पाहताच मैनाबाई घाबरली. ती म्हणाली, ‘नंतर ये.’ त्यानंतर दुस-यांदा देव सर्प बनून थोडा मोठ्या रुपात आला. याहीवेळी मैनाबाई घाबरली. तिनं पुन्हा नंतर यायला लावलं. असंच घाबरत घाबरत मैनाबाई टाळत गेली. तिनं नवश बोलल्यानुसार टिळा लावला नाही. शेवटी त्या सर्पानं अतिशय मोठ्या रुपात येवून मुलाला जकडलं व मारुनही टाकलं. 

 महत्वाचं सांगायचं म्हणजे असे नवश कबूल करु नये की जी नवशं आपण पुर्ण करु शकणार नाही. ज्यातून आपल्यावरच संकट निर्माण होईल. देवदासी प्रथाही अशीच आहे. या प्रथेतही असा नवश केला जातो की मला जर पहिली मुलगी झाली तर मी देवाला वाहीन. मग पहिली मुलगी झाल्यास तिचं देवाशी लग्न करुन दिलं जात होतं. त्या मुलीचा नंतर उपभोग मंदिरातील पुजारी व त्या गावातील श्रीमंत लोक घेत असत. ज्या मुलीला वेश्या बनविण्यापासून प्रत्यक्ष देवही वाचवू शकत नाही. अलीकडं ही देवदासी प्रथा कालबाह्य झालेली आहे. त्या प्रथेला कायद्यानुसार बंधन घालण्यात आलेलं आहे. याचाच अर्थ प्रत्यक्ष स्व मायबापच आपल्या मुलीला वेश्यापणाच्या दलदलीत लोटत असत.

अलीकडं नवसाचे प्रकार बदललेले आहेत. आता लोकंही हुशार झाले आहे. ते नवशं करतात. परंतू कोणते! मला मुल झाल्यास मी तुझ्या चरणावर कोंबडा, बकरा, रेडा, मेंढरु इत्यादी प्राणी कापीन. काही ठिकाणी खेड्डी देईल. खेड्डी अर्थात डुक्कर. आता हे प्राणी काय त्यांच्या बापाची मालमत्ता आहे काय की त्यांंना त्यांनी जन्म दिला काय, त्यांच्या जीवाला कापण्याचा अधिकार त्यांंना आहे. परंतू मनुष्यप्राणी मोठा हुशार प्राणी आहे. आपल्या स्वार्थासाठी नवश पुर्ण करतांना बिचा-या मुक्या प्राण्यांचा जीव घेत असतो.

 मुल न होणे हे आपल्या जनुकीय बदलावर अवलंबून असते. जेव्हा स्री आणि पुरुषांचे गुणसुत्र एकत्र येतात. तेव्हा मुलं होतात. यात नवशाला प्राधान्य नाही. यात काही गोष्टी ह्या अनुवांशीक घडत असतात. याचा अर्थ असा की ज्या पती पत्नीच्या मागील पिढीत एखादी पिढी जर वंधत्वाची असेल तर याही पिढीत मुलं होत नाही. वांझ निपजते. याचाच अर्थ की मुल होण्यासाठी लागणारे गुणसुत्र हे त्या बाळाच्या जन्मानंतर त्यात आलेले नसतात. याचाच अर्थ असा की कोणाला मुल होणे वा न होणे हे आपल्या नवसावर अवलंबून नसते. ती आपली अंधश्रद्धा आहे. कधीकधी कावळा फांदीवर बसून फांदी मोडल्यागत एखादी गोष्ट घडून जाते. त्यानुसार आपण आपला नवश पुर्ण झाला. आपल्याला देव पावला असा अर्थ घेतो व आपल्या नवसामागे अंधश्रद्धा जोडतो. काही काही लोकं असे आहेत की जे लोकं एखाद्याला मुल न झाल्यास त्याचेवर जादूटोणा केलेला आहे असे म्हणतात आणि मानतातही. कोणी कुस बांधली आहे असे मानून भोंदूगीरी करणा-या बाबांकडे जातात. तो लुटलुट पैसा लुटतो. परंतू मुलं होत नाही. कधीकधी होतात. जेव्हा असे बाबांकडे जाणे असते तेव्हा. तो,आपल्याला मुलं होणा-या वस्तू खायला देतो तेव्हा. त्यामुळं आपला विश्वास बसतो. मग आपल्याला वाटतं की आपण बाबांकडे जात असल्यानं मुल होत आहे. परंतू ते चूक आहे. मुलं बाबांकडे गेल्यानं नाही तर स्री पुरुषांमधील गुणसुत्र एकत्र आल्यानं होत असतात. हे गुणसुत्र एखाद्यावेळीच एकत्र येतात.

  गुणसुत्र ही डीएनए प्रथिनांची एक संघटीत रचना असते. जी पेशीच्या केंद्रकामध्ये आढळते. पुरुषांमध्ये एक्स वाय अशा दोन स्वरुपाची गुणसुत्र असतात. तर स्रीमध्ये एक्स स्वरुपाचीच गुणसुत्र असतात. जेव्हा पुरुषातील एक्स गुणसुत्र स्रीमधील एक्स गुणसुत्राशी संयोग पावतात. तेव्हा मुलगी होते आणि जेव्हा ही वाय गुणसूत्र स्रीमधील एक्स गुणसूत्राशी संयोग पावतात. तेव्हा मुलगा जन्मास येतो. ही प्रक्रिया जेव्हा सुरु असते. तेव्हा तो गर्भ पाडण्यासाठी काही लोकं गर्भनिरोधक गोळ्याही खातात. अशावेळी पोटात जर मुलगा जन्माचे गुणसूत्र असतील तर अचानक या गोळ्या सेवनानं एक्स गुणसुत्र वाढीला लागतात व एक्सचे प्रमाण जास्त झाल्यानं उभयलिंगी अर्थात तृतीयपंथी मुले जन्मास येतात. कारण ही गोळ्या खाण्याची पद्धत बाळ राहण्याच्या आठ ते दहा आठवड्यानंतर होत असते. त्यावेळी बाळाच्या जन्माचा पाव काळ निघून गेलेला असतो व बाळ पाव स्वरुपात विकसीत झालेलं असतं. ज्यावेळी कधीकधी या गोळ्या खाल्ल्यावरही बाळाचा गर्भपात होत नाही. तेव्हा असा प्रकार घडतो.

पर्यायानं सांगायचं झाल्यास मुल जन्मास येणं किंवा न येणं तसेच ती मुलं उभयलिंगी जन्मास येणंं हे आपल्या हाती वा कोण्या देवाच्या वा बाबांच्या हाती नसतं. ते आपल्याच हातात असतं. आपण काय खातो, काय पितो यावरही मुल जन्माचं तंत्र अवलंबून असतं. आपण आपल्या आहारात जर एक्स एक्स गुणसुत्राचेच जास्त पदार्थ खात असू, तरही आपल्या शरीरात त्याचा परिणाम होतो. हे सर्व गुणसुत्र आपल्या शरीरात अन्नपदार्थातून येत असतात. जे अन्न आपल्याला प्राणीमात्रापासून व वनस्पतीपासून मिळत असतं.

काही काही वेळी बाबाकडे गेल्यावर मुलं होतात. त्याचं कारण म्हणजे बाबा हे आपल्याला आपल्या गुणसुत्राला नियंत्रीत करणा-या गोष्टी घडवून आणतो. ज्यातून मुलं होतात. जसं बाबा आपल्याला लिंबू खायला देतो. ज्या लिंबातून वाय गुणसुत्र आपल्या शरीरात प्रवााहीत होतात. तो आपल्याला दही, पालक, आंंबट वस्तू सेवन करायला लावतो वा तो असे पदार्थ आपल्याला खायला सांगतो की त्यातून आपल्या शरीरात असलेल्या एक्स वाय गुणसुत्राची पुर्तता होते. त्यानंतर लोकांना पुत्रप्राप्ती होते. परंतू लोकांचा विश्वास बसतो की बाबांमुळं पुत्रप्राप्ती झाली. ते ती गोष्ट इतरांना सांगतात व तेही बाबांकडं जायला लागतात. अंधश्रद्धा वाढीस लागते नव्हे तर अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. 

हे झालं बाबांचं. कधीकधी देव नवसाला पावतो असा संकेत आहे. परंतू ज्या देवाच्या मंदिरात आपण जातो ना श्रद्धेनं. त्या देवाच्या मंदिरात जात असतांंना आपण नजरचुकीनं असे अनेक पदार्थ खात असतो की ज्यातून आपल्या शरीरातील पुत्रप्राप्तीसाठी आवश्यक असणा-या गुणसुत्राची संख्या वाढते. ते पदार्थ खात असतांना आपल्याला माहीतही नसते की यातून अपत्यप्राप्ती होईल. परंतू तरीही आपण खातो. त्यानंतर तेथून परत आल्यावर लोकांना अपत्यप्राप्ती होते व लोकांचा साहजीकच समज होतो की अमूक अमूक देवाच्या दर्शनाला गेल्यावर अपत्यप्राप्ती झाली. ते एकदुस-याला ती गोष्ट सांगतात. ती गोष्ट पसरत जाते व हळूहळू त्या देवाचे महत्व वाढायला लागते. परंतू ती अंधश्रद्धा आहे हे आपल्यालाही कळत नाही.

 विशेष सांगायचं म्हणजे देवांची पुजा अवश्य करा. कारण त्यातून आपल्याला मानसीक आधार मिळतो. बाबांकडे अवश्य जा. कारण तिथं गेल्यानंही तुम्हाला मानसीक आधार मिळतो. परंतू स्वतःला तिथं जावून अंधश्रद्धेच्या हवाली करु नका. अंधश्रद्धेचे गुलाम होवू नका. जेणेकरुन तुम्ही फार मोठ्या संकटात ओढले जाल. तुमच्यावर फार मोठे संकट कोसळेल व तुम्ही नेस्तनाबूत व्हाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here