पंतप्रधानाच्या सभेतून ओळखपत्राअभावी आल्यापावली परतले राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार!

पंतप्रधानाच्या सभेतून ओळखपत्राअभावी आल्यापावली परतले राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार!

पंतप्रधानाच्या सभेतून ओळखपत्राअभावी आल्यापावली परतले राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार!

📍8 लाख रूपये वाचल्याची देवराव भोंगळे यांची अजब प्रतिक्रिया

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर/चिमूर : 12 नोव्हेंबर
चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीच्या सहाही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर येथे आले होते. यावेळी मंचावर राकाँ नेता प्रफुल्ल पटेल, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे उमदेवार सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी ही आयोजित केली त्या चिमुर विधानसभा क्षेत्राचे उमदेवार बंटी भांगडिया, ब्रम्हपुरीचे उमेदवार क्रिष्णलाल सहारे, चंद्रपूरचे उमदेवार आ. किशोर जोरगेवार यांच्यासह माजी खासदार रामदास तडस, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, रमेश गजभे, माजी आमदार मितेश भांगडिया आदी उपस्थित होते.पण, देवराव भोंगळे यांना मंचावर स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले.
महायुतीच्या विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची गती दुप्पट केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक झाली आहे. उलट महाविकास आघाडी सरकारने गेल्या अनेक दशकांपासून येथील जनतेची रेल्वेची मागणी दाबून टाकली होती. महायुतीच्या सरकारने वरोडा-कान्पा रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. नागपूर-गडचिरोलीचा रेल्वेमार्ग जवळपास होण्यात जमा आहे, अशीही मोदी यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा विकास करण्याची कुवतच महाविकास आघाडीत नाही. त्यांच्या सत्ताकाळात विकासकामांना केवळ ‘ब्रेक’ लावण्याचेच काम त्यांनी केले आहे. त्यात त्यांची ‘पीएचडी’ आहे. विकासकामांना अडकवणे, लटकवणे आणि भटकवणे यात तर काँगे्रसवाल्यांची ‘डबल पीएचडी’ आहे. त्यांच्या अडीच वर्षात त्यांनी मोठमोठ्या प्रकल्पांचे मार्ग थांबवले. आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत, अशा शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घणाघात केला.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची अमंलबजावणी गेल्या सात दशकात काँग्रेसने केली नाही. उलट दहशतवाद आणि नक्षलवादावर त्यांनी राजकीय पोळया भाजल्या. जम्मू-कश्मीरच्या विधानसभेत जे घडले ते सर्वांनीच पाहिले. आम्ही 370 कलम संपवून भारताच्या संविधानसोबत तेथील जनतेचे नाळ जोडली. पण आता पुन्हा 370 लागू करण्याचा प्रस्ताव विरोधक विधानसभेत आणताहेत. अशा विकासविरोधी आणि संविधानविरोधी महाविकास आघाडीला तुम्ही पुन्हा राज्याच्या लुटीचा परवाना देणार आहात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.

*बॉक्स*

राजुरा विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांना चिमूर येथे पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मंचावर जाण्याचे ओळखपत्रच तयार नसल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागले. मात्र जाताना त्यांनी, माझे आठ लाख रूपये वाचले! अशी अजब प्रतिक्रिया दिली. सभेच्या खर्चाच्या विभाजनात उमदेवाराच्या नावावर काही खर्च जोडला जातो. त्यावरच हे भाष्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here