सह्याद्री प्रतिष्ठानाच्या वतीने गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दुर्ग संवर्धन कार्य गेल्या चौदा वर्षापासून अविरत करत आहे. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी महाराष्ट्रभर दुर्ग संवर्धन चळवळ ही संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाने होत आहेत. संस्थेने आजवर १००० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा तर २००० पेक्षा जास्त दुर्ग दर्शन मोहिमा राबविल्या आहेत.
रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी किल्ले रेवदंडा येथे सह्याद्रि प्रतिष्ठान अलिबाग विभागाच्या मावळ्यांची पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्यावर स्वच्छता मोहीम राबविली.
या मोहीमेत किल्यातील वास्तुवरील झाडे झुडपे साफ करण्यात आली. तसेच वास्तुंच्या आजुबाजुलाही ऊगवीलेली झुडपे साफ करुन पुरातन वास्तुंना मोकळा श्वास देण्यात आला. या स्वच्छता मोहीमेत २५ ते ३० दुर्गसेवकांनी सहभाग नोंदविला.
पुढेही असेच स्वच्छता मोहीमा घेऊन साफसफाई करण्याचे ठरवीले आहे ज्यामुळे किल्ला पर्यटकांसाठी नक्कीच पर्वणी ठरतील असे सहयाद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे मोहिम प्रमुख आकाश चिमणे यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष जितेंद्र म्हात्रे,
उपअध्यक्ष सन्मेश नाईक, रक्षित पाटील, तेजस वर्तक, मनोज पारकर, हृषीकेश शिंदे, प्रथमेश धसाडे, स्वप्नील भांजी, प्रशांत भोईर (उरण), जयेंद्र भोईर (उरण), आकाश चिमणे, सिद्धार्थ पाटील, सचिन सुर्वे, गौरव सुर्वे, अपूर्वा, श्रुती वारगे, वैदेही सुर्वे, मेघा पाटील, ओंकार पाटील, विहार ठाकूर, श्रेयश घरत मोहिमसाठी उपास्थित होते.