रस्ता रुंदिकरनाला ब्राम्हणीतील नागरिकांचा विरोध
विनामोबदला नागरिकांच्या जागा बळकावन्याचा पालीका प्रशासनाचा प्रयत्न, अखेर नागरिकांनी बंद पाडले रस्त्याचे काम
युवराज मेश्राम प्रतिनिधी
कळमेश्वर: – नगर परिषद कळमेश्वर ब्राम्हणी प्रशासन व सार्वजणीक बांधकाम विभागाच्या वतीने मटण मार्केट ते ब्राम्हणी धापेवाडा डि पी रोड रुंदिकरनाचे काम केल्या जात आहे. या रस्ता रुंदिकरनात प्रचंड घोळ झालेला असुन विना मोबदला नागरिकांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा स्थानिय नागरिकांनी आरोप करित काम बंद पाडले आहे.
रस्ता रुंदिकरनाकरिता सबंधीत महसूल व भुमापन विभागाच्या रेकाॅर्ड नुसार कूठलीही माहिती व मोजणी न करताच प्रत्यक्ष काम सुरु केले. या रस्त्यावरिल पांदणरस्ता केवळ १७ मिटर रुंदिचा शासन रेकाॅर्डला असताना प्रत्यक्षात माञ ३० मिटर रुंदिकरनाचे रस्ताकाम केल्या जात आाहे. विशेष म्हनजे पांदन रस्ता सोडूण प्रशासन नागरिकांच्या वसाहतीतील घरांसह प्लाॅटवर रुंदिकरनाच्या नावावर अतिक्रमण करित आहे.
या महामार्गाच्या कामासाठी ब्राम्हणी येथील वार्ड क्र. ४ मधील गीरे ले आउट,गायकवाड ले आउट,पठान ले आउट,सुशीला को.आॅप.सोसायटीतील सुमारे ५० प्लाॅट धारकांना जागा खाली करन्याच्या पालीकेने नोटिसा दिल्या आहे. या व्यतीरिक्त कसलीही सूचना न देता थेट जमिनीवर अतिक्रमण करण्यात येत असल्याने अगोदर जमीन संपादन करून मोबदला द्यावा तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी करूनही त्यांची दखल न.प.प्रशासनाने न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करन्याचा पविञा स्थानियांनी घेतला आहे.
या मार्गाच्या कामासाठी ६० फूट जमीन संपादित असताना सदरील कामासाठी नागरिकांना कसलीही सूचना न देता १०० फुटाची आखणी करण्यात आली आहे.
६० फुटांपेक्षा जास्त रस्ता करायचा असेल तर उर्वरित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी नागरिकांनी मुख्याधिकारी व अभीयंता सार्वजणीक बांधकाम विभाग यांच्याकडे अर्ज दिला आहे.
अद्याप नागरिकांचे कोणतेही समाधान झाले नाही उलट रस्त्याचे काम माञ जोमात सुरू आहे.
सदरिल ले आउट हे अवैध व अक्रुषक असल्याचे पालीका प्रशासनाकडून सागन्यात येत असुन तुम्हाला मोबदला मिळनार नाही,मग गेल्या अनेक वर्षांपासून येथील अनेक प्लाॅटधारकांकडून माञ मालमत्ता करवसूली नियमीत करन्यात येत आहे.
पालीका प्रशासन व सार्वजणीक बांधकाम विभागाने जमीण अधिग्रहना करिता महसूल प्रशासनाच्या रेकाॅर्ड नुसार व भुमापन विभागाकडूण सदरिल पांदन रस्त्याची मोजणी करुनच या रस्त्याचे काम करावे तोवर आम्ही हे काम बंद पाडू असा ईशारा नुकत्याच झालेल्या पञकार परिषदेत दिला.पञकार परिषदेला प्रा.हर्षवर्धन ढोके,अरुण वाहने,गंगाधर नागपूरे,पींटू निंबाळकर,दादाराव सीरसाट,महेंद्र सातपुते,प्रभाकर ठाकरे,अशोक काथोटे,हरिषचंद्र नागपूरे,प्रकाश कानफाडे,गजानन सोनसरे,कमलाकर धांडे,ज्ञानेश्वर वानखेडे,अरविंद दूबे,सतिश कडू,बसू गुरुजी,राजू धोटे,आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.