प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ताडोबा भ्रमंतीत व्यस्त, जिल्ह्यातील जनता प्रदूषणाने त्रस्त
• ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच अधिकारी गैरहजर
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
चंद्रपूर, 12 डिसेंबर :
चंद्रपूर आणि सभोवतालचे वायू प्रदूषण हिवाळ्यात धोकादायक पातळी गाठते. जिल्ह्याची ओळख वाघांचा जिल्हा असली तरीही प्रदूषणाच्या बाबतीतही हा जिल्हा खास अर्थाने ओळखला जातो. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून यादरम्यान प्रदूषणा संदर्भात येणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्य तत्पर राहावे लागते. मात्र चंद्रपूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चंद्रपूर विद्युत केंद्राच्या विशेष मदतीने ताडोबा भ्रमंतीवर गेल्याची माहिती आहे. तेथील एका रिसॉर्ट मध्ये त्यांची खास व्यवस्था करून देण्यात आली आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मोठ्या प्रमाणात अधिकारी कामावर रुजू असतात मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हे अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या काळातच आपली मौजमजा करण्यात व्यस्त आहेत. प्रदूषणाची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या काळात आपल्या कर्तव्यावर उपस्थित न राहता स्वतःची मौजमजा करण्यात व्यस्त असणे ही गंभीर बाब आहे.
हिवाळी अधिवेशना दरम्यान प्रदूषणा संदर्भात येणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी अधिकाऱ्यांना कार्य तत्पर राहावे लागते. अशावेळी कर्तव्यदक्ष अधिकारीच नसल्याने इतर अधिकाऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नांची उत्तरे पाठवी लागत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन न घेता, प्रदूषण नियंत्रण अधिकारी स्वतःचा मोबाईल बंद करून ताडोबाच्या भ्रमंतीवर गेल्याची चर्चा आहे.