दरोडेखोरांचा हल्ला परतवून लावणा:या प्रतिक्षाचे भाजप नगरसेविकेने केले कौतुक.

संदीप साळवे प्रतिनिधी

डोंबिवली :- घरात आलेल्या दरोडेखोरांनी वडिलांच्या गळ्य़ावर चाकू ठेवला हे पाहून कोणत्याही मुलींची हिंमत हरली असते. पण प्रतिक्षाने हिंमत न हरता धाडसाने दरोडेखोरांशी दोन हात करीत वडिलांचा जीव वाचविला. प्रतिक्षाच्या धाडसाचे भाजपा नगरसेविका मनिषा धात्रक हिने भेट घेऊन कौतुक केले.

डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील सुरजमनी इमारतीत राहणारे अशोक गौरी हे निवृत्त बॅक अधिकारी आहेत. अशोक गौरी हे अपंग असून ते आपल्या पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या घरी 5 तारखेला दरोडा पडला होता. दोन पुरूष आणि एक महिलेने घरात घुसुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. प्रतिक्षाने स्वत: आणि वडिलांवरील हल्ला परतवून लावला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी 12 तासाच्या आत चार आरोपींना गजाआड केले. या दरोडयात महिला सामील झाली होती. या घटनेने एकीकडे पोलिस गस्ती वाढविण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे आपल्या वडिलांची दरोडेखोराच्या तावडीतून सुटका केलेल्या प्रतिक्षाच्या पाठीवर मनिषा धात्रक यांनी कौतुकाची धाप दिली आहे. माङया मुलीने हिंमत दाखविली म्हणूनच मी जिंवत आहे अशी प्रतिक्रिया ही अशोक गौरी यांनी दिली आहे. प्रतिक्षा सारख्या धाडसी मुलींचे कौतुक केले पाहिजे असे ही अशोक यांनी सांगितले.

नगरसेविका धात्रक यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वपोनि संजय साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणोश बडणो, पोलिस नाईक करणो, पोलिस शिपाई कुंदन भांबरे, मनोज बडगुजर आणि भगवान सांगळे यांची ही भेट घेऊन त्यांनी दरोडयातील आरोपींना 12 तासाच्या आत अटक केल्याबद्दल कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here