युवा तलाठ्याने बदलविले तलाठी कार्यालयाचे स्वरूप तलाठी चेन्नुरवार यांनी स्वखर्चातून केले सौंदर्यीकरण.. 4 महिन्यात बदलले कार्यालयाचे स्वरुप

युवा तलाठ्याने बदलविले तलाठी कार्यालयाचे स्वरूप

तलाठी चेन्नुरवार यांनी स्वखर्चातून केले सौंदर्यीकरण..
4 महिन्यात बदलले कार्यालयाचे स्वरुप

युवा तलाठ्याने बदलविले तलाठी कार्यालयाचे स्वरूप तलाठी चेन्नुरवार यांनी स्वखर्चातून केले सौंदर्यीकरण.. 4 महिन्यात बदलले कार्यालयाचे स्वरुप

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि*
9403321731

नागभिड- सर्वच कर्मचाऱ्यांची प्रथम मनीषा असते की स्वतःचे घर हे सुसज्ज,सुंदर असले पाहिजे.. मात्र याला अपवाद म्हणून नागभीड येथील युवा तलाठ्याने आपले घर न सजवता ज्या कार्यालयात आपण काम करतो त्यांची योग्य ती सजावट करून व आवश्यक ते बदल करून एक नवे रूप कार्यालयाला दिलेले आहे.

गेल्या आगस्ट मध्ये तलाठी चेतन.जे.चेन्नुरवार हे डोंगरगाव (बु.) इथून नागभीड तलाठी कार्यालायत रुजू झाले.. शेतकरी व सर्वसामान्य जनेतला योग्य ती सेवा देण्याच्या कार्यबरोबरच ज्या कार्यालयात त्यांना काम करावयाचे होते त्याची अवस्था फार बिकट झालेली होती,त्यांना दिसली… सहा महिने पासुन विजेचे बिल बाबत या अगोदरचे तलाठी यांनी तहसिल कार्यालय सोबती संपर्क साधा यांच्या प्रयत्ना यश आले नाही,विधूत मंडळ,कार्यालायची वीज कापल्या गेली होती दुसरीकडून उसनी घेऊन वीज वापरली जात होती ही बाब त्यांच्या लक्षात येताच वीज मंडळाशी संपर्क साधून स्वतः जवळील पंधरा हजार रुपये खर्च करून तात्काळ नवीन वीज कनेक्शन त्यांनी जोडून घेतले.

या बरोबरच कार्यालयाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला होता व दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या असल्याने अस्वच्छ परिसराची स्वच्छता केली… बाहेरून आलेल्या जनेतला व शेतकरी वर्गाला बसण्यासाठी सोय उपलब्ध नव्हती यासाठी परिसरात सिमेंटची बाके लावण्यात आली आहेत.. मोठ्या प्रमाणात कौले फुटलेली होती त्यामुळे ती बदलवून संपूर्ण  इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली.. यासोबतच विविध फुलझाडे लावण्यात आली.. शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीच्या आजूबाजूला लोक येऊन घाण करायचे ते संपूर्ण पणे आज बंद झाले आहे.या सोबतच तलाठी चेतन चेन्नुरवार यांनी कार्यालयातील अंतर्गत भागात सुद्धा फार मोठे बदल केले यामुळे एरवी काही कामासाठी कार्यालायत गेल्यावर निरस्त वाटायचे मात्र आज गेल्यास प्रसन्नता वाटते…

या सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयाचा दर्शनी भागात फलक नव्हता मात्र आज घडीला कार्यालयाच्या दर्शनी भागात ओळख देणारा फलक लावलेला आहे, सोबतच स्वच्छता गृहातील सांड पाण्याच्या निचरा होण्यासाठी शोष खड्डा तयार करणे, मोकळ्या जागेत फळझाडे लावणे, ग्रास लाँन तयार करणे,स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे,विविध योजनांची माहिती देणारे फलक तयार करणे, इत्यादी कामे येणाऱ्या काही दिवसात पूर्ण करण्याच्या मानस त्यांनी व्यक्त केला आहे..!!

आजपर्यंत नागभीड येथील या तलाठी कार्यालायत अनेक अधिकारी आले त्यांनी आपला कार्यकाळ आहे त्या परिस्थितीत असलेल्या कार्यालयात पूर्ण केला व गेले मात्र या तालुकास्तरीय कार्यालयाची रुजू होताच सुधारणा करणारे तलाठी चेतन,जे.चेन्नुरवार हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत..!!

त्यांनी केलेल्या या बदलाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच अनेक लोक येता जाताना या कार्यालयाकडे कुतूहलाने बघत आहेत.. दरम्यान जि.प.सदस्य संजय गजपुरे तसेच शेतकरी बंधुनी सदर कार्यालयाला भेट देत तलाठी चेतन ,चेन्नुरवार यांचे अभिनंदन केले आहे..!!

आपल्या या निस्वार्थी कामाबद्दल चेतन.जे. चेन्नुरवार म्हणतात, ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या प्रयत्न सगळे करतात त्याच प्रमाणे कार्यालय सुद्धा हे स्वच्छ व सुंदर असले पाहिजे या विचारातून हा बदल करण्याचा विचार मनात आला यासोबतच शेतकरी व सर्वसामान्य जनेतची कामे वेगाने पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणार आहे,या साठी माझे वरिष्ठ अधिकारी मां ,तहसिलदार साहेब तसेच मंडल अधिकारी धाञक साहेब यांच्या मार्गदर्शनामधून वरिल कामासाठी यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here