राष्ट्रीय युवा दिनी समर्पण फाउंडेशन सावनेर द्वारा
*युथ हुंकार-2022 चे आयोजन*
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो.नं.9822724136
सावनेर-13 जानेवारी 2022
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 12 जानेवारीला समर्पण फाउंडेशन सावनेर तर्फे युवा हुंकार 2022 ही आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन युथ हुंकार वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमात एकूण 12 शाळा व महाविद्यालयातील 2-2 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयांवर भाषणे झाली.यात माझे राष्ट्रवादाचे व्याख्यान,माझा आदर्श विवेकानंद,कोलार नदीचे पुनर्जीवन,युवकांचा राजकारणात सहभाग काळाची गरज,वाहतूक नियंत्रण इत्यादी.
कार्यक्रमात निर्णायक भूमिकेत प्रा.संजय भेलकर,पीएसआय आशिष सिंग ठाकूर आणि डॉ.विलास मानकर होते.यांनी मुलांना प्रोत्साहन देत वक्तृत्व शैलीच्या विकासासाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात इयत्ता 8 ब ते 10 ब शालेय गटातील विद्यार्थिनींमध्ये प्रथम पारितोषिक कु.दिव्या महतपुरे इयत्ता 9 वि.सारस्वत पब्लिक स्कूल,द्वितीय पारितोषिक कु.यशस्वी डाखोळे सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल सावनेर तर तृतीय पारितोषिक समीक्षा किशोर जोगी भिकुलाल चांडक हायस्कूल केळवद हिला मिळाले. तसेच महाविद्यालयीन गटातील मुलींमध्ये प्रथम पारितोषिक इयत्ता 11 वि च्या कुमारी रीद्धी डाखोळे केंद्रीय विद्यालय नागपूर,द्वितीय पारितोषिक कुमारी वैदही बनसिंगे के जॉन पब्लिक स्कूल आणि तृतीय पारितोषिक कुमारी साक्षी सुरजुसे रेवनाथ चोरे महाविद्यालय ला मिळाले.प्रास्ताविक समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक मुलमुले,संचालन डॉ.राहुल दाते यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिषेक गहरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन चे सदस्य विनोद बागडे तुषार उमाटे,कुलभूषण नवधिंगे, नितीन पाटोडे,प्रवीण नारेकर, मंदार मंगळे इत्यादींनी सहकार्य केले.