तळोधी बा. व परिसर येथील सर्वज्ञ विचारमंच तर्फे देवपुजा सजावट स्पर्धा

पद्मश्री कै.डॉ.सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

तळोधी बा. व परिसर येथील सर्वज्ञ विचारमंच तर्फे देवपुजा सजावट स्पर्धा पद्मश्री कै.डॉ.सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

✍राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332

तळोधी (बा.) :- सुमारे १२ व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून वंचित, पिडीत ,शोषीतांना व स्त्रियांना बोलायला शिकवलं होतं. तोच वसा व वारसा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाला अनुसरून सिंधुताई सपकाळ या बोलत्या झाल्या.बोलण्याच्या व समाजकार्याच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.असे प्रतिपादन आदर्श शिक्षिका मनपा नागपूर च्या छायाताई रुपेश कलासुआ यांनी व्यक्त केले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय देवपुजा सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. आणि रविवारी आयोजित स्पर्धेच्या निकाल समारंभात मुख्य परिक्षक व वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
या निकाल समारंभाच्या सुरुवातीला कै.पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देवपुजा सजावट स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश प्रत्येकांच्या घरातील देवपुजेची इत्यंभूत माहिती व सजावट करण्यामागचा उद्देश सर्वांपर्यंत पोहचविणे व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बोलतं करणे हा होता. कोरोनाच्या भिषण व भयावह काळात जिथे मुख्य प्रवाहातील मिडीया पोहोचू शकला नाही अशा दुर्गम भागात व कानाकोपऱ्यात महानुभावांचे कॅमेरे पोहचवले व अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित विविध सभा,व्याख्याने प्रवचनांच्या माध्यमांतून महानुभाव धर्मातील लहान बालकांपासून ते सर्वसाधारण स्त्रियांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून विचारपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना बोलतं करून समाजप्रबोधन करण्यात आले असेही त्यांनी पुढे बोलताना सांगीतलं.
महानुभाव धर्मातील देवपुजा म्हणजे प्राप्त होणार्‍या साध्यापर्यंत पोहचण्याचे साधन असलेले विशेष आहेत. व त्या विशेषांना अतीशय सुंदर व कल्पकतेने सजावट करणाऱ्या महानुभावांच्या परंपरागत, प्राचीन व आधुनिक कलासंस्कृतीचा प्रत्यय या स्पर्धेच्या अनुषंगाने अनुभवता आला असे विचार या स्पर्धेचे परिक्षक प्रा.डॉ.नितेश रामटेके यांनी मांडले.
राज्यभरातील विविध स्पर्धकांमधून सौ.तृप्तीताई घोडे,बारामती जि.पुणे यांना प्रथक क्रमांक, शौर्य आनंद दिक्षित सोलापूर द्वितीय क्रमांक, श्री चंद्रवर्धन माहुरकर मुंबई यांना तृतीय क्रमांक व गिरिधर दत्तात्रेय चेंडके, सांगली यांना प्रोत्साहनपर क्रमांक देऊन गौरवण्यात आले.
येथिल पहिले बक्षिस- अरूणकूमार लोणपांडे तळोधी,दुसरे बक्षिस कांताप्रसाद मेश्राम तळोधी, तिसरे बक्षिस टिकाराम बन्सोड तळोधी व प्रोत्साहन पर बक्षिस छायाताई कलासुआ नागपूर यांच्या सहयोगातून देण्यात आले.
या समारंभाचे संचालन सर्वज्ञ विचारमंच चे सचिव ऍड.संतोष रामटेके नागपूर , प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.विलास रामटेके ब्रम्हपुरी व आभार संस्थेचे कार्याध्यक्ष निकेश अलोणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here