वरोरा बसस्थानक व भद्रावती बसस्थानकाची स्वच्छता कमिटीकडून तपासणी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेत बसस्थानकांचा सहभाग
✍️मनोज आर गोरे
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970
वरोरा:राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेअंतर्गत वरोरा आगार व भद्रावती बस स्थानक येथे तिसरे सर्वेक्षण तपासणी करीता आलेले नांदेड विभागाच्या पथकाचे वरोरा आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर यांनी वरोरा बसस्थानकावर स्वागत केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परीवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची तपासणी व्हावी. प्रवाश्यांना सेवा व सुविधा मिळतात की नाही याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यासह परिसराची स्वच्छता राहते की नाही याची दरवर्षी पहाणी व्हावी. व त्या दृष्टीने प्रवाश्यांना सोयी सुविधा कमतरता असलेल्या भागात त्या देण्याच्या उद्देशाने राज्यपरिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वरोरा बस स्थानक व भद्रावती बस स्थानक या वरोरा आगाराच्या बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सदर समितीमधील मा.कांबळे विभाग नियंत्रक नांदेड ,मा. तागडे उपयंत्र अभियंता नांदेड, मा. गौहारे कामगार अधिकारी नांदेड, यांनी भेट दिली व बसस्थानकाची तपासणी केली. यावेळी वरोरा प्रवाशी विश्वासु संघटनेचे पदाधिकारी श्रीमती तेलतुमडेताई व पत्रकार श्री.देवगडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी वरोरा बसस्थानक येथे रांगोळी काढण्यात आलेली होती व बसस्थानक स्वच्छ सुंदर करण्यात आलेले होते. तसेच सदर तपासणी करिता बस स्थानक सुंदर व स्वच्छ करण्यामध्ये पुण्यवर्धन वर्धेकर, आगार व्यवस्थापक वरोरा व सर्व पर्यवेक्षक कर्मचारी, तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत वर्षभरात वरोरा आगाराच्या बस स्थानकातील स्वच्छतेबरोबरच पर्यावरण पूरक वसुंधरे बाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवा सुविधा तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने प्रत्यक्ष विविध जागेवर जावून केली.