राजीव नगर वसाहतीत सिमेंट काँक्रिटीकरन रस्त्याचे भूमिपूजन

राजीव नगर वसाहतीत सिमेंट काँक्रिटीकरन रस्त्याचे भूमिपूजन

राजीव नगर वसाहतीत सिमेंट काँक्रिटीकरन रस्त्याचे भूमिपूजन

ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक :- खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीतून राजीव नगर वसाहत या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक अमोल जाधव व पी. आर. पी. प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवने, डॉ. विशाल जाधव, सागर देशमुख व वसाहतीतील प्रमुख कार्यकर्ते व महिलांच्या हस्ते कुदळ मारून व नारळ फोडून करण्यात आले.

खासदार निधीतून वीस लाख रुपयाचा निधी ह्या कामासाठी साठी मंजूर झाला आहे. राजीव नगर वसाहतीतील नागरिकांना पावसाळ्यात ड्रेनेजच्या अनेक समस्या, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत मात्र राजीव नगर वसाहत येथील नागरिकांनी अमोल जाधव यांच्याकडे ही समस्या मांडली ह्या समाश्याचा पाठपुरावा करत हे काम मंजूर करून घेतले व या कार्यक्रमाचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राजीव नगर वसाहतीतील नागरिकांनी अमोल जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले.

कार्यक्रमाप्रसंगी सोपान जाधव, गणेश तुपसुंदर, रावसाहेब मकासरे, मधुकर गायकवाड, भिकाजी सावंत, महादेव लोखंडे, सुधाकर भवाळे, अशोक लोखंडे, शशिकला वाकळे, शालिनी शेळके, शरद जाधव, कैलास जाधव, सीताराम मोरे, अलका शेळके, किरण लोखंडे गौतम अंभोरे व राजीव नगर वसाहत येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here