महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, फळपिक विमा, प्रक्रिया, मार्केटिंग परिषद व सिध्देश्वर अग्रोटेक प्रदर्शन संपन्न.

54
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, फळपिक विमा, प्रक्रिया, मार्केटिंग परिषद व सिध्देश्वर अग्रोटेक प्रदर्शन संपन्न.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, फळपिक विमा, प्रक्रिया, मार्केटिंग परिषद व सिध्देश्वर अग्रोटेक प्रदर्शन संपन्न.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, फळपिक विमा, प्रक्रिया, मार्केटिंग परिषद व सिध्देश्वर अग्रोटेक प्रदर्शन संपन्न.

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

कोकण :-रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील नांदगाव मध्ये महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, फळपिक विमा, प्रक्रिया, मार्केटिंग परिषद व सिध्देश्वर अग्रोटेक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रदर्शनात सेंद्रिय खते, बि बियाणे कीडनाशके,पेस्टीसाईडस्, सेंद्रिय उत्पादने व कृषी अवजारे यांचे स्टॉल लावण्यात आले होते.मुरुड, अलिबाग, रेवदंडा येथून आलेल्या शेतकऱ्यांना कृषी विषयक अनेक नवीन तंत्रज्ञान प्रयोग, आधुनिक शेती पद्धत, सेंद्रिय पद्धतीने करता येणारी शेती, पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करण्यासाठीचे व खत व्यवस्थापन इत्यादीचे मार्गदर्शन कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी यांनी केले.”रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत भात शेती करण्यासाठीचे प्रमाण कमी झाले आहे.तसेच कोकणात गेल्या दोन ते तीन वर्षापासून येथील हवामानात आमूलाग्र पद्धतीने बदल झाला आहे. त्यामुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वेगवेगळ्या किडीचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादन कमी होत आहे.कोकणची आंब्याची उत्पादकता ही ४००० टनांची आहे. कोकणात पूर्वी येणाऱ्या फळांच्या पिकात सध्या ४० टक्के घट झाली आहे. परंतु उत्पादन खर्च, मजूर खर्च, कीटकनाशकांचा खर्च, बाजारातील दलाल या सर्व समस्यांना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.तसेच कोकणात प्रक्रिया उद्योग खूपच कमी असल्यामुळे आमच्या आंब्याला कॅनिंग साठी योग्य दर मिळत नाही. त्यासाठी यावेळी आंब्याला योग्य दर मिळावा हीच आमची मागणी आहे. तसेच आम्हाला विक्री करण्यासाठी योग्य ती साखळी निर्माण करून द्यावी. शेत मालाची वाहतूक योग्य, सुरळीत व जलद करता येण्यासाठी कोकणातील रस्ते चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहेत. ” असे यावेळी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.

” कोकणाला ७२० किमी चा सागरी किनारा लाभला आहे.खारी हवा असल्यामुळे मसाला पदार्थ, आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम, जांभूळ, करवंदे इत्यादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते.आपल्याकडे असलेल्या मातीचे व पावसाचे प्रमाण व वैशिष्टे पाहता नैसर्गिक संपत्तीचा वापर करून कोकणातील फळांची मोठ्या प्रमाणात लागवड करून त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळाला असता. त्यासाठी कोकणातील होणाऱ्या मुबलक पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
आंब्याचे क्षेत्र कमी होत चालल्यामुळे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने नवीन तंत्रज्ञानद्वारे संशोधन केलेले आंब्याच्या झाडांचे पुनर्जीवन करून आंबा झाडांचे जीवन वाढ करण्यास सुरुवात केली. तसेच नारळ, सुपारी यांवर होत असलेल्या हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी नवनवीन शोध घेत त्यावरील उपाययोजना व औषधे शोधण्यात मदत करतात.आंबा, काजूचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार च्या मदतीने वेगवेगळे संशोधन सुरू आहे.तसेच अन्न द्रव्य व्यवस्थापन कसे करायचे, तसेच त्या पिकांची पौष्टिकता तशीच राहावी यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करण्याचे काम दापोली येथील संशोधक करत आहेत.तसेच आंबा उत्पादन वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आंबा दूत नेमण्यात आले आहेत.

कोकणात सुपारी, नारळ, आंबा, काजू यांचे पीक पारंपारिक पद्धतीने घेत असताना त्या असलेल्या पिकामध्ये दुसरे अंतर्गत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.त्यात त्यांनी दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंग, मोहरी, बडीशेप इत्यादी नगदी उत्पन्न देणारे अनेक मसाले पीक तसेच शोभिवंत फुलांचे पीक घेतले पाहिजे. तसेच ड्रॅगन फळ, अवकोडा यांसारखे फळ यांचे पीक घेता येईल.आंबा, नारळ, काजू, फणस, कलिंगड, पपई इत्यादी फळांचे फळमाशी, तुडतुडे किड्यांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करण्यासाठी जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करण्याची गरज आहे. पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जैविक शेती गरजेची आहे.तसेच पाण्याचे योग्य नियोजन, फळांची गर्भाधारणा, मजुरांची कमीत कमी आवश्यकता इत्यादीचे नियोजन करण्यासाठी ड्रिप इरिगेशनची गरज आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ड्रिप इरिगेशनची सुविधा करावी. त्यामुळे आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.काजूच्या बोंडापासून शीतपेय बनविणे, नंतर इथोनोल बनविणे व शेवटी त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम, जायफळ पासून मोरांबा बनविणे इत्यादी अनेक संशोधन सध्या दापोली मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ करत आहे.” असे डॉ. प्रकाश शिनगारे, संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी महाराष्ट्र कृषी विभागाच्या असलेल्या अनेक शेती विषयक असलेल्या योजनांची माहिती देखील यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.महात्मा गांधी योजनेत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान योजना आहे. तसेच कृषी उत्पादन करण्यासाठी प्रधान मंत्री कृषी योजनेत ५० टक्के अनुदान मिळते.पापड, लोणचे, फळांचा मोरांबा, जॅम, जेली या पदार्थांसाठी व त्यांच्या पॅकेजिंग व विक्री साठी कर्ज योजना मिळते.तसेच बचत गट, महिला, वैयक्तिक शेतकरी इत्यादी सर्वांनी लाभ घेऊ शकतात.शेतकऱ्यांना यंत्र वापरासाठी अल्प, अत्यल्प प्रमाणात कर्ज मिळते.यावेळी डॉ. प्रकाश शिनगारे, संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ. विनोद पाटील, संशोधन संचालक, सिरम इन्स्टिट्यूट पुणे, बालाजी ताटे, विजय बाबर, एरिया व्यवस्थापक, गोदरेज अग्रोवेत ली. व इत्यादी कृषी अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.