महाड मतदार संघात नियोजनबध्द विकास कामे करण्यावर भर – ना. भरतशेठ गोगावले
दासगांव तलाव संवर्धन आणि सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन
विवेक काटोलकर
माणगाव प्रतिनिधी
7798923192
माणगाव-माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे. तरीही महाड विधानसभा मतदार संघात नियोजनबध्द कामे करण्यावर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी मी विकासमंत्री मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी आज दासगांव येथे बोलताना केले.
दासगांव येथील ऐतिहासिक तलावाच्या संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन ना. गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला तहसिलदार महेश शितोळे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुकाराम सनाळकर, शाखा अभियंता श्री. महाजन यांच्यासह माजी जि.प. सदस्य जितेंद्र सावंत, सुरेश महाडीक, प्रमोद गोगावले, सिताराम उभारे, दिलीप उकिर्डे, निखिल शिंदे, सौ. प्रेरणा सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
दासगांव गावामध्ये एक चांगले काम व्हावे ही दासगांवकरांची इच्छा या तलावाच्या कामातून पूर्ण होत आहे. गावातील इतर कामांना देखील चालना देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. दिया उसका भी भला ना दिया उसका भी भला अशा पध्दतीने आपण कामे करणार असल्याचा टोला देखील ना. गोगावले यांनी लगावला.
माजी जि.प. सदस्य जितेंद्र सावंत यांनी, आमदार म्हणून भरतशेठनी हे काम मंजूर केले होते. आज नामदार म्हणून या कामाचे भूमिपूजन ते करीत असल्याचा आनंद होत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. सनाळकर यांनी येत्या तीन ते चार महिन्यात या तलावाचे काम पूर्ण होईल असे सांगितले.
दासगांव येथील या तलावाच्या संवर्धनासाठी राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने ३ कोटी ७० लाख ७४ हजार १२५ रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी ३ कोटी ४३ लाख, ५९ हजार ६५३ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता दिली आहे.
या तलाव संवर्धन कामामध्ये तलावाची साफसफाई करणे, तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करून ते पाणी शुध्द करणे, तलावाभोवती गॅबियन वॉल बांध्ाून पदपथ बांधणे, स्वच्छतागृह बांधणे, तलाव परिसरात वृक्ष लागवड करणे आणि तलावाचे सुशोभिकरण करणे या कामांचा अंतर्भाव आहे.