महात्मा गांधी विद्यालय येथे विवेकानंद जयंती साजरी

183
महात्मा गांधी विद्यालय येथे विवेकानंद जयंती साजरी

महात्मा गांधी विद्यालय येथे विवेकानंद जयंती
साजरी

महात्मा गांधी विद्यालय येथे विवेकानंद जयंती साजरी
वकृत्व स्पर्धा ,कथाकथन स्पर्धाचे आयोजन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.त्या निमत्ताने मंडळाचे सल्लागार सुबोध अनंत मोकल यांच्या सौजन्याने इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची उतारा पाठांतर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे, जनता शिक्षण मंडळाचे प्राथमिक शाळा सारळ, वैजाळी इंग्रजी माध्यम आणि वैजाळी मराठी प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय मानकुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेतील विजयी 18 स्पर्धकांना प्रमाणपत्रे व रोख बक्षिसे देण्यात आली तसेच उर्वरित सहभागी सर्व स्पर्धकांना स्वामी विवेकानंदांची पुस्तके देण्यात आली.
सदर स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व संयोजन ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी सर यांनी केले होते.
सूत्रसंचालन व आभार सौ प्रिया दुर्वे यांनी मानले.
परीक्षक म्हणून चांदणी ठोंबरे आणि अतिश मोकल व चंद्रमुनी इजागत यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धेसाठी मुख्याध्यापक गायकवाड सर व पर्यवेक्षक प्रबळकर सर यांचे सहकार्य लाभले.
अध्यक्ष सुबोध मोकल यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे आणि अभ्यासू व्हावे असे आवाहन केले.
सदर स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून गायकवाड मॅडम उपस्थित होत्या तसेच बीजी शिकारी यांनी सुद्धा आपले मार्गदर्शन केले. वआलेल्या स्पर्धकांना व व्यवस्थापकांना अशाच प्रकारचा प्रतिसाद पुढील काळात द्यावा असे आवाहन डी व्ही कुलकर्णी सर यांनी केले.
सदर स्पर्धेत सार्थक ठोंबरे, दिविषा कोळी, स्वरा मोकल, वैदेही म्हात्रे, स्वप्नाली म्हात्रे, रुद्राक्ष म्हात्रे ,श्लोक म्हात्रे कृषीका कोळी यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रभावीपणे मांडले.
आणि बक्षीस समारंभा नंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.