सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे १३ जाने २०२५ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती संयुक्त सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते..
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद तथा राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डहारे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देऊन ते युवकासाठी एक प्रेरणादायक कसे होते, असे सांगून त्यांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात राजमाता जिजाऊ यांच्या अमूल्य सहभाग कसा होता ते विद्यार्थ्यांना समजून सांगितले.