द्रोणागिरी शासकीय औ० प्र० संस्था, उरण, येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जंयतीची औचित्य साधुन द्रोणागिरी शा.ओ.प्र.संस्था, उरण येथे राष्ट्रीय युवा दिनाचे भव्य आयेजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवुन करण्यात आली. मा. अतिथींच्या हस्ते संस्था परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या उपक्रमासाठी पी एस आय नागनाथ कुठार यांनी विविध झाडे उपलब्ध करुन दिली.
त्यानंतर मान्यवरांनी राष्ट्रीय युवा दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धाची पाहणी केली.
मान्यवर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून पुजनाने झाली. ई-प्रणालीव्दारे दिवप्रज्वलनाची नवीन संकल्पना या कार्यक्रमात सुरु करण्यात आली त्यानंतर अतिथींचा फुलझाडांची सुंदर रोप देवून सन्मान करण्यात आला त्यानंतर सुत्रसंचालकांनी कार्यक्रमाची संकल्पना व प्रस्तावना मांडली. उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना युवा दिनाबाबत, भविष्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेच्या मा. प्राचार्यांनी युवा दिनानिमित्त आफ्ले मनोगत व विध्यार्थीच्या पुढीच वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
त्यानंतर मा. पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आली. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर राज्यगीत व राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास आयए मेसी चेअरमन नागेश आकोडे 1एम सी अम्बर आर आर गायकवाड, मोहन आव्हाड मुख्य अभियंता नागनाथ कुठार ,मोरा सागरी पोलीस ठाणे, एम्. व्ही. पिल्लने प्राचार्य औ प्र. संस्था उरण, संस्थेचे गट निदेशक संदेश कीर सर व देशमुख सर आणि संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.