कोची : केरळच्या कोचीन शिपयार्डमध्ये जोरदार स्फोट झाला असून त्यात पाच लोक ठार झाले आहेत. या स्फोटात ११ लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. ओएनजीसीचं एक जहाज दुरुस्तीसाठी आणण्यात आलं होतं. ही दुरुस्ती करत असताना जहाजात अचानक स्फोट होऊन आग लागल्याने ही दुर्घटना झाली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत.

आज सकाळी शिपयार्डमध्ये जोरदार आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरून गेल्याने एकच धावपळ उडाली. या स्फोटात पाचजण जागीच ठार झाले आणि ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्फोटामुळे शिपयार्डवर आग लागली असून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. स्फोटाचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here