डॉ. अरुण गाणार यांना मातृशोक.

51

डॉ. अरुण गाणार यांना मातृशोक.
गाणार परिवाराची असिमीत हानी- खेमराज गाणार

Dr. Maternal mourning to Arun Ganar.
Dr. Maternal mourning to Arun Ganar.

कोसारा (जि. यवतमाळ):- येथील स्मृतीशेष प्रभाबाई गाणार, यांचे काल दि.11/02/2021 रोज गुरुवारला त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने व दीर्घ आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. अतिशय मितभाषी, कुटुंबवत्सल, प्रेमळ, मेहनती, सामाजिक दायित्वाची जाणीव अशा अनेक गुणांचा संगम त्यांच्या ठायी दडलेला होता. अतिशय सात्विक आणि कष्टाळू जीवन त्यांनी व्यतीत केले. त्यांनी आपल्या सौ.पारबताबाई ठमके, सौ.आशा ढेंगळे, श्री.खेमराज गाणार, सौ.सुर्यकांता नगराळे, डॉ. अरुण गाणार या आपल्या मुलांना देखील त्यांनी संस्कारयुक्त जीवन जगण्याची शिकवण व प्रेरणा दिली याचेच फळ म्हणून त्यांचे कनिष्ठ सुपुत्र डॉ.अरुण गाणार हे वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत डॉक्टर आहेत. तसेच इतर मुले-मुली देखील यशस्वी, सात्विक आणि धार्मिक जीवन जगत आहेत. स्मृतिशेष प्रभाबाई लहानुजी गाणार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.