Fraudulent gang busted, morkya-arrested-from-chembur-vashinaka
Fraudulent gang busted, morkya-arrested-from-chembur-vashinaka

नकली गुणपत्रीका विकणा-या टोळीचा पर्दाफास,मोरक्याला चेंबूर वाशीनाका येथून अटक.

Morkhya arrested from Chembur Vashi Naka
Fraudulent gang busted, morkya-arrested-from-chembur-vashinaka

राकेश जाधव प्रतिनिधी

मुंबई:- नकली गुणपत्रीका विकणा-या टोळीचा पोलीसांनी पर्दाफास केला आहे. या टोळीच्या मोरक्याला पोलिसांनी चेंबूर वाशीनाका येथून अटक केली आहे. अनेक शैक्षणिक मंडळाची, विध्यापीठाची नकली गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तसेच विविध कंपन्यांचे अनुभव प्रमाणपत्रे बनवून देणाऱया एका भामटयाला गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने अटक केली. आरोपी पाच ते दहा हजार रुपयांच्या मोबदल्यात अशाप्रकारे बनावट गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे उपलब्ध करून देत होता.

चेंबूर वाशीनाका येथील फारूक गल्लीत असनेल्या अमन टायपिंग सेंटर या दुकानात अब्दूल सत्तार कासिम अली शेख 42 नावाचा व्यक्ती पाच ते दहा हजारात विविध शासकिय विभागीय शैक्षणिक मंडळांची बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तसेच विविध वैंपन्यांचे अनुभव प्रमाणपत्रे बनवून देत असल्याची खबर युनिट-2 ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद काटे, एपीआय संतोष सांळुखे आदिंच्या पथकाने त्या दुकानावर छापा टाकला असता अब्दुलचा काळाबाजार उघडकिस आला. दुकानात पुढच्या बाजूला झेरॉक्सचा कारभार तर मागच्या बाजूला अब्दूल लोकांना मागणीप्रमाणे विविध शासकिय विभागीय शैक्षणिक मंडळांची बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तसेच विविध वैंपन्यांचे अनुभव प्रमाणपत्रे बनवून देत होता. घटनास्थळावर पोलिसांना महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन या शिक्षण मंडळाची विविध वर्षाची गुणपत्रिका मिळून आल्या. अब्दूलकडे सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये विविध शैक्षणिक मंडळांची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तसेच विविध कंपन्यांच्या अनुभव प्रमाणपत्रांचा साठा मिळून आला. गेल्या सहा महिन्यांपासून अब्दूलचा हा झोल सुरू असुन आतापर्यंत त्याने जवळपास तीनशे जणांना अशी बनावटप प्रमाणपत्रे बनवून दिली आहेत. त्यात बहुतकरुन चतुर्थ श्रेणीत काम करणाऱयांचा समावेश आहे. अब्दूलला पुढील कारवाईसाठी आरसीएपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here