नागपूर जिल्ह्यात सरपंच व उपसरपंच निवडणुकीत 83 जागी काँग्रेसचे सरपंच विजयी.
युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- नागपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. आज झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसचे 83 सरपंच निवडून आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, सावनेर, हिंगणा, उमरेड व काटोलया सहाही विधानसभा मतदार संघात या ग्राम पंचायत निवडणूका पार पडल्या होत्या. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली व मा.ना.श्री नितीनजी राऊत, मंत्री ऊर्जा तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा, मा.ना.श्री सुनिलजी केदार, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण तसेच काँग्रेसचे सर्वनेते व कार्यकर्त्यानी एकत्र येऊन आज जिल्ह्यात 83 जागी सरपंच निवडून आले आहेत. जिल्ह्यातील बडया-बडया भाजप नेत्याच्याच घरात भाजपाला दारुण पराभव झाल्याने नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे.
काँग्रेस कार्यकर्ते गावागावात प्रचंड उत्साहात जित साजरी करताना दिसत असून भाजप वर्तुळात मात्र चिंतेचे सावट दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी अभिनंदन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर टाकलेल्या या विश्वासाबद्दल राजेंद्र मुळक यांनीसर्व जनतेचे व कार्यकर्तेचे आभार मानले आहेत.