14 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला पीडित मुलीच्या आईची साथ, नात्याला काळीमा.

51

14 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला पीडित मुलीच्या आईची साथ, नात्याला काळीमा.

The girl was abducted, raped and her body dumped in a pond.
Rape of 14-year-old girl, accused accompanies victim’s mother, defames relationship.

पुणे:-  आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आलाय. गल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितले असता मुलीला शिवीगाळ करून आरोपीची साथ दिली. याप्रकरणी एका 14 वर्षीय मुलीने तक्रार दिल्यानंतर पीडित मुलीच्या आईसह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही आईसह खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहण्यास आहेत. यातील आरोपीने फिर्यादी यांच्या घरच्यांशी गोड बोलून त्यांच्याशी जवळीक वाढवली. तसेच फिर्यादीला रेशन देण्याचे आमिष दाखवून घराजवळच्या सार्वजनिक शौचालयात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला दमदाटी करत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला असता आईनेही तिला शिवीगाळ करून परत आरोपी सोबत जाण्यास भाग पाडले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी आईसह आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.