कॉलेजला जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला ट्रॅक्टरचालकाने पळवले.

जालना:- तालुक्यातील एका गावातून ट्रॅक्टरवर चालकाने कॉलेजला निघालेल्या मालकाच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला मे महिन्यात पळवून नेले होते. पोलीसांनी तपास करुन त्या मुलाला करमाळा तालुक्यातून अटक केली आहे.
दरम्यान, आरोपीने फूस लावून मुलीला विविध जिल्ह्यात नेले होते. या काळात त्यांच्यात झालेल्या संबंधामुळे ती मुलगी आता गर्भवती राहिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कॉलेजला गेलेली मुलगी परत न आल्यामुळे मुलीच्या पालकांनी मौजपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस या मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाने मुलीला पळवून नेले असून हे दोघेजण करमाळा तालुक्यात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मौजपूरी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.