Wardha reveals tire theft case with fake truck; 29 lakh worth of goods seized.
Wardha reveals tire theft case with fake truck; 29 lakh worth of goods seized.

वर्धा बनावटी ट्रकसह टायर चोरीचा गुन्हा उघड; 29 लाखाचा माल जप्त.

Wardha reveals tire theft case with fake truck; 29 lakh worth of goods seized.
Wardha reveals tire theft case with fake truck; 29 lakh worth of goods seized.

आशीष अंबादे प्रतिनिधी

वर्धा:- वर्धा शहरात 11 फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणी झालेल्या टायर चोरी संबंधाने गस्त सुरू असताना पोलिसांनी नाकेबंदी करीत बनावटी दोन ट्रेलरसह टायर चोरीचा गुन्हा उघड करून 28 लाख 51 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यात 11 रोजी काही दुकानातून टायर चोरी गेल्याची तक़्रारी होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस गस्तीवर असताना एम. एच. 31/सी.क्यू. 5596 या एकाच क्रमांकाचे दोन ट्रेलर हे नागपूर वळण मार्गाने जात असताना अडवून चालक हरदेव सिंग, रा. चंद्रपूर यास विचारपूर केली असता ट्रक त्याचे मालकीचा असल्याचे त्याने सांगितले. लागलीच त्याच क्रमांकाचा ट्रक आल्याचे दिसताच त्यास थांबविले असता तो ट्रेलर सुद्धा त्याचेच मालकीचा असल्याचे सांगितले. दोन्ही ट्रकचे कागदपत्र तपासले असता ते एकाच मालकाचे नावावर असल्याचे आढळून आले. वाहनांचे चेचीस क्रमांक तपासलेअसता दोन्ही वाहनांना एकच चेचीस क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून ट्रक मालक हरदेव सिंग याचे संशय बळकावल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सतीश जाक्कुला, रा. राजुरा, जि. चंद्रपूर याच्या मदतीने सावंगी मेघे हद्दीतून टायर चोरून स्वत:च्या ट्रकला लावल्याचे सांगितले.

यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे अधिकारी व कर्मचारी राजुरा जि. चंद्रपूर येथे जावून सतीश जक्कुला यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी हरदेव सिंग मुनासा सिंग देवल 40 रा. अंबादास वॉर्ड नंबर 13, सतिश जक्कुला 28 रा. सोमनाथ पुरा दोन्ही राजुरा जिल्हा चंद्रपूर यास अटक करून बनावट ट्रक व चोरीस वापरण्यात आलेला 28 लाख रुपये किमतीचा एम.एच. 31 सी. क्यू. 5596 क्रमांकाचा ट्रेलर व 50 हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले चार टायर, मोबाईल असा एकूण 28,51,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीतांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस अंमलदार संतोष दुरगडे, गजानन लामसे, दिनेश कांबळे, दिनेश बोथकर, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, राजेंद्र जयसिंगपुरे, मनीष कांबळे, गोपाल बावनकर, नवनाथ मुंडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here