भारतीय बौद्ध महासभा शाखा दिंडोरी तालुक्याच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न.

✒नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒
नाशिक:- भारतीय बौद्ध महासभा शाखा दिंडोरी तालुक्याच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आंबे दिंडोरी येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमांचे प्रतिमाला माल्यार्पण करुन राष्ट्रीय सचिव बी.एच गायकवाड, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भिकाजी कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव महाराष्ट्र राज्य अशोक केदारे, जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल, तालुकाध्यक्ष रितेश गांगुर्डे, सरचिटणीस प्रदीप गांगुर्डे दिंडोरी तालूका कार्यकारणी व नाशिक जिल्हा कार्यकारणी यांनी केले.
या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक बी.एच. गायकवाड सरांनी या शिबिराचे उद्घाटन केले. बी.एच. गायकवाड सरांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची रचना व कार्यपद्धती आणि कार्यकर्ता कसा असावा व कार्यकर्त्यांची आचारसंहिता, भिकाजी कांबळे सरांनी पदाधिकारी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, अशोक केदारे सरांनी कार्यालयीन कामकाज आणि लेखा पद्धती या विषयावर या तीनही प्रमुखांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरा मध्ये प्रश्नोत्तरातून समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी दगु सोनवणे, चंद्रकांत गांगुर्डे, संगीताताई पगारे, जयेश मोरे, दिंडोरी तालुका अध्यक्ष रितेश गांगुर्डे यांनी प्रमुख मान्यवर व जिल्हा कार्यकारणी व उपस्थित सर्व धम्म उपासक उपासिका या सर्वांचे आभार मानले. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे संपूर्ण नियोजन दिंडोरी तालुका शाखेने केले. कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती रत्नाकर साळवे चावदास भालेराव,राजेश साळुंखे, कृष्णाजी सोनवणे, शरद भोगे, भाऊलाल कटारे, सोमनाथ गायकवाड, सचिन बागुल, मधुकर सिताराम पगारे, शरद गांगुर्डे, घनश्याम शिंदे, शिला बाळू शिंदे, प्रशिक सोनवणे, सागर गायकवाड आर.पी.आय.तालुकाध्यक्ष, गणेश शार्दुल वंचित बघूजन आघाडी तालुकाध्यक्ष, मदन बागुल, रोहिदास नाना बागुल, सागर गायकवाड, विनायक जाधव,रवींद्र गांगुर्डे, अक्षय शार्दूल,आंबे गावातील उपासक- उपासिका उपस्थित होते.