हिंगणघाट शहरातील विविध विषयाला घेउन शिवसेनेचे तहसिलदाराना निवेदन.
● हिंगणघाट भूमी अभिलेख विभागात होत असलेले भोंगळ कारभाराबाबत तक्रार.
● न.पा बांधकाम नकाशा मंजुरीसाठी अधिकारी लोकांना देत आहे त्रास.

✒मुकेश चौधरी, उपसंपादक✒
📱7507130263
हिंगणघाट:- हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने हिंगणघाट शहरातील नगर पालिकेच्या भोंगळ कारभार तसेच तहसिल कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागात होत असलेले भोंगळ कारभाराबाबत निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. निवेदनात काही अति महत्त्वाचे विषयावर सुचना केल्या.
निवेदनात देण्यात आलेले विषय.
१) नगर परिषदच्या कर विभागातील कर अधीक्षकाच्या कामामुळे शहरातील नागरिकांना फेरफार, दाखल खारीज, कुटूंबातील आपसी फेरफार मध्ये कोणतेही कारण सांगून पैश्याची मागणी करून त्रास देने.
२) नगर रचनाकार विभागातील बांधकाम नकाशा मंजुरी साठी त्या विभागातील अधिकारी सुद्धा लोकांना त्रास देत आहे काहीही करण सांगून तसेच घर बांधणी नकाशा मध्ये चुका कडून लोकांना अडचणी अटकाऊन पैसे ची मागणी करणे.
३) टॉवरचे पॅनल, केबल अंडर ग्राउंड करणे यासाठी कोणत्या नियमावली अनुसार परवानगी दिली, आणि त्या टॉवर वाल्यानी डिपॉझिट रक्कम किती भरली आणि नगर परिषदनी कोणत्या अटी शर्तीवर मंजुरी देऊन खोद काम करण्यास सांगितले करण त्यांच्या या खोदकामामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडित झाली, नागरिकांना घाण पाणी पुरवठा झाला तरी नगर परिषद प्रशासन जागृत नाही. हिच परिस्थिती प्रशासन लागण्या पूर्वी सुद्धा होते पण आता तर प्रशासन लागले आहे ना, म्हणून या शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नगर परिषद प्रशासननी गंभीर व्हावे. तसेच तहसील कार्यालयात हिंगणघाट शहर व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, वाल्मिकी योजना, बाहेर गावातून येणाऱ्या लोकांना उत्पन्न दाखला न देणे,त्यांना पैश्याची मागणी करणे. भूमी अभिलेख विभागातील प्रमुख अधिकारी पासून साधारण कर्मचारी पर्यंत ची मंडळी पैसे घेतल्या शिवाय काम करीत नाही या मुळे सर्व त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आहे. या वर सुद्धा आपण कार्यवाही करावी. या संपूर्ण शहरात अवैध रित्या रेती चा व्यवसाय होत असतांना प्रशासन कडून हातमिळवणी केली कि काय असे दिसू लागले. या अवैधरित्या चोरी करणाऱ्या लोकांशी R I, आणि काही पटवारी या चोरीत मिळून असल्याचे दिसून येत आहे. यात काही RI आणि पटवाऱ्याला स्थानिक आमदार यांचे दबाव आहे कारण आमदाराच्या काही मंडळी या अवैध रेतीच्या रेतीच्या वेवसायत आहे या बाबत काही अधिकारी कडून दबत्या आवाजात सांगण्यात आले आहे, काही अधिकारी या स्थानिक आमदार पासून या रेतीचोरी च्या कारणावरून त्रासून आहे असे आम्हाला तहसिल कार्यल्यातून काही कर्मचाऱ्या कडून सांगण्यात आले आहे. या शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होते असते,आणि त्यावेळी सुद्धा डंकिन येथून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असते आणि आता सुद्धा चालू आहे. चोरून आणलेली रेती लोकांना जास्त भावात विकल्या जात आहे आणि म्हणून कुठे तरी तहसिल विभाग आणि पोलीस प्रशाशन जवाबदार आहे असे दिसून येत आहे.
या सर्व विषयावर आपण कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना मोठ्या स्वरूपात आंदोलन करेल व पुढे येणाऱ्या प्रसंगाला दोषी प्रशासन राहील, या सर्व समस्यांवर कार्यवाही व्हावी या साठी जिल्हा उप प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमने,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, मनोज वरघणे, शंकर मोहमारे, देवेंद्र पडोळे, बंटी वाघमारे, शहर उप प्रमुख जय रोहनकार, गजानन काटवले,राजू माडेवार,शंकर झाडे, दिलीप चौधरी, हिरामण आवारी, मुन्ना त्रेवेदी, बलराज डेकाटे,अनंता गलांडे,दिनेश धोबे इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्तीत निवेदन देण्यात आले.