भूमिपुत्र महिला ब्रिगेडतर्फे आगळावेगळा सासू सून मेळावा कार्यक्रम संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱8830857351
चंद्रपूर : 13 फेब्रुवारी
मुल येथे आगळ्यावेगळ्या सासू सून मेळाव्याचे आयोजन रविवारी, 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याला शंभराच्या वर सासु सुनेच्या जोड्यांनी सहभाग घेतला. यावेळी सुरुवात सासु सुना मधील एक मिनिट संवाद स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, वेगवेगळे खेळ यावेळी घेण्यात आले तसेच मी सावित्री बोलते या एकांकिका अप्रतिम असे सादरीकरण कविता संगोजवर यांनी केले. सासु सुनांच्या दैनंदिन जीवनावर आधारित लघु नाटिकेचे सादरीकरण शुभांगी शेंडे व त्यांच्या टीमने केले. अनेक महिलांनी गाण्यातून व नाट्यातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांना वाचा फोडली. चंद्रपूरचे सुप्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ दुर्गाप्रसाद बनकर यांच्या नांदा सौख्यभरे या प्रबोधनातून सासु सुनांमधील संवाद तसेच दोन व्यक्तींमधील संवाद सुधारण्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या बाबी असतात यावर सखोल असं मार्गदर्शन झालंकुटुंबाचे स्वास्थ्य जपण्यासाठी व सुदृढ नवीन पिढी निर्माण करण्यासाठी सासु सुनांमधील सुसंवाद किती आवश्यक आहे यावर बनकर सरांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले व शशिकला गावतुरे यांनी अध्यक्षीय भाषण केले. शशिकला गावतुरे यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आली .अतिशय आनंदात व उत्साहात हा सोहळा पार पडला. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व संसारिक महिलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देता यावा म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला असे आयोजक डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशासाठी सीमा लोणबुले, शुभांगी शेंडे, रत्ना चौधरी, आशा नागोसे, पुनम मोहूरले, मीरा शेंडे, जयश्री भुस्कडे, प्रिया गुरनुले, सोनू मोरे, स्मिता बांगडे, वैशाली निकुरे, वंदना गुरनुले, स्मिता गुरनुले, चित्रा गुरनुले, कविता सांगोजवार यांनी परिश्रम घेतले.