रानवडे येथे श्री गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

53
रानवडे येथे श्री गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

रानवडे येथे श्री गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

रानवडे येथे श्री गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

✒️ नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048

माणगांव :- माणगाव तालुक्यातील रानवडे येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री गणेश जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.

रानवडे ग्राम विकास मंडळ, समस्त ग्रामस्थ, महिला मंडळ,आणि श्री गणेश क्रिकेट क्लब, श्री गणेश जन्मोत्सव सोहळा व उपरोक्त मंडळाच्या वतीने मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री गणेश जयंती दिनी अगदी सकाळ पासूनच काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ६:३० ते ७:३० वा. अभिषेक, सकाळी ७:३० ते ८:०० वा. महाआरती, सकाळी ८:०० ते ९:०० वा. श्रींचेनामस्मरण, सकाळी ९:०० ते १२:०० वा. श्री गणेश जन्मोत्सव कीर्तन, दुपारी १:०० ते ३:०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४:०० ते ५:०० वा. हवन विधी,६:०० ते ७:०० वा. भगवद गीतेवर प्रवचन, रात्रौ ७:०० ते ८:३० वा. महाप्रसाद ९:०० ते १० वा.नवनाथ सत्संग मंडळ यांचे सुस्वर भजन. १०:०० वा. हरिजागर – रानवडे ग्रामविकास मंडळ, महिला मंडळ. याप्रमाणे दिवसभरामधे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

खरोखर रानवडे गावावर श्री गणेशाची कृपाच आहे असेच संबोधावे लागेल कारण चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतील हे गाव, स्वच्छ्ता असो, सांस्कृतिक किंवा काही सामाजिक उपक्रम असो या गावातील सर्वच बांधव येकत्रित येवून आगदी मनापासून काम करीत असतात, आणि खरोखर रानवडे या गावाकडून खुप काही घेण्या सारखे आहे, हे गाव एक प्रेरणादाई गाव आहे,
दि.१३/०२/२०२४ रोजी जो काही श्री गणेश जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी स्थानिक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद बंधु, महिला मंडळ पदाधिकारी व सभासद तसेच मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सभासद बंधु , त्याच प्रमाणे युवा मंडळ तसेच पंच क्रोशितील तमाम गणेश भक्त बहु संख्येने उपस्थीत होते.