भिवापुर पोलिसांची तीन रेती टीपर वर करवाई

45

भिवापुर पोलिसांची तीन रेती टीपर वर करवाई

त्रिशा राऊत नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9096817953

भिवापूर :- भिवापुर. सदरची कारवाई समर्थ पेट्रोल पंपजवळ दिनाक. १० फरवरी रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

भिवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस अमलदार भिवापूर परिसरात अवैध गौण खनिज तपासणी संबंधाने पेट्रोलिंग करत असताना निलज कडून भिवापूरच्या दिशेने समर्थ पेट्रोल पंप जवळील पोलिस नाक्याजवळ आले असता तीन टिप्पर क्रमांक एम एच ४९ बीझेड- ०९९३, एम एच ४० सीटी ९९२०, एम एच ४० सिएम ८९९३ या वाहनांची तपासणी केली असता तिनही ट्रक चालक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा रेती बाबतपरवाना नसल्याने तिन्ही ट्रक टिप्पर मध्ये एकूण २२ ब्रास रेती किमती १ लक्ष १० हजार रुपये व तिन्ही टिप्परची किंमत ८० लक्ष रुपये असा एकूण ८१ लक्ष दहा हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपी अरविंद जितू तोडासे वय ३९ वर्ष राहणार चंपा तालुका उमरेड जिल्हा नागपूर, दीपक सुभाषराव पाठक वय ते ३० वर्ष राहणार चंपा तालुका उमरेड जिल्हा नागपूर, मारुती रामकृष्ण मळावी वय ३३ वर्ष नवेगाव पाचगाव जिल्हा नागपूर यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला असून वरील आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ६५/ २५ कलम ३०३(२), ४९, ३(५) BNS सह कलम ४८ ८), ४८ ७)४, २१ खाणी आणि खनिज अधिनियम सह कलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सह कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचा मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे