सुरक्षित इंटरनेट वापराविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा
✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 84597 75380
बुलढाणा : – इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी, विशेषतः मुले, महिला आणि तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जाणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यशाळा घेण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिवस पाळला जातो. यावर्षी 11 फेब्रुवारी रोजी “टूगेदर फॉर अ बेटर इंटरनेट” या संकल्पनेअंतर्गत हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी अजिंक्य गोडगे, अजित जंगम, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील खुले यांचे सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय 11 फेब्रुवारीपासून, एक देशव्यापी जागरूकता मोहीम सुरु करत आहे. केंद्र सरकारच्या माहिती सुरक्षा आणि शिक्षण जागरुकता प्रकल्पांतर्गत आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इंटरनेट वापरकर्त्यां अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धती, सायबर स्वच्छता, प्रमुख सायबर धोके, आणि इंटरनेट स्ट्रॅटेजीज याबाबत माहिती देण्यात आली. यासह इंटरनेटचे फायदे व तोटे, सायबर फ्रॅाड, फिशिंग, स्मिशिंग, डिजिटल अरेस्ट, ॲानलाईन फसवणुकीपासून बचाव आदी महत्त्वपूर्ण माहिती सुनील खुले यांनी या कार्यशाळेत दिली.
जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील खुले यांनी यावेळी सादरीकरण करुन सुरक्षित इंटरनेट वापराबाबत माहिती दिली.